Jalna News: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय)हमीभाव कापूस खरेदी केंद्र शुक्रवार (ता.२८) पासून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कापूस शिल्लक असल्याने व खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगा असल्याने खरेदीला मुदतवाढ मिळावी, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी ही केंद्राकडे खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. दरम्यान, खरेदीला अखेर १५ मार्च पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे..कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत घनसावंगी तालुक्यात घनसावंगी, कुंभार पिंपळगाव, राणी उंचेगाव आदि ठिकाणी सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू होती. तीन केंद्रावर तीन हजार ९४७ शेतकऱ्यांचा ८९ हजार ८९० क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. या कापसाची किंमत सरासरी ७२ कोटी रुपये एवढी होते. .CCI Cotton Procurement: राज्यात कापूस खरेदी १५ मार्चपर्यंत .दरम्यान एकुण सात हजार २०९ शेतकऱ्यांनी कापूस खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केली होती. यापैकी तीन हजार ९४७ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला. कापूस खरेदी न झालेले तीन हजार २६२ शेतकरी आहेत यांचा कापूस अद्यापही घरातच आहे..CCI Cotton Procurement Stop: कापूस संकटात; सीसीआयची खरेदी आजपासून बंद, मुख्यमंत्र्यांच्या मागणीनंतरही मुदतवाढ नाही.यासाठी खरेदीला मुदतवाढ मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती. सभापती तात्यासाहेब चिमणे, सचिव राधा तांदळे यांनी सीसीआयचे उपमहाप्रबंधक यांना पत्र देऊन हमीभाव कापूस खरेदी केंद्राला मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली होती..बाजार समितीकडे अनेक शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केलेली होती. अनेक शेतकऱ्यांचा कापूस घरात पडून होता. दरम्यान, सीसीआय कापूस खरेदी केंद्र बंद झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार होते. आपण वारंवार यासाठी पाठपुरावा करीत होतो. दरम्यान, कापूस खरेदीला १५ मार्च पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.-तात्यासाहेब चिमणे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, घनसावंगी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.