डॉ. आरती मुंडे-गुर्जरकसावा स्टार्चपासून तयार केलेली जैवविघटनशील फिल्म पारंपरिक प्लॅस्टिक फिल्मसाठी पर्याय म्हणून उपयोगी ठरू शकते. या फिल्मची भौतिक, यांत्रिक गुणवत्ता तसेच अन्नपॅकेजिंगसाठी योग्यता तपासणी करण्यात आली. .सध्याच्या काळात वाढता प्लॅस्टिक प्रदूषणाचा वाढता स्तर पाहता पर्यावरणपूरक पॅकेजिंग साहित्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. हे लक्षात घेऊन कसावा स्टार्चचा वापर करून जैवविघटनशील प्लॅस्टिक फिल्म विकसित करण्याचा प्रयोग करण्यात आला. या संशोधन प्रयोगामध्ये फिल्मचा वापर बिस्कीट आणि चिप्स पॅकिंगसाठी करण्यात आला. या अभ्यासासाठी आयएस-९८४५:१९९८ (बीआयएस) मधील नमूद केलेल्या अटींनुसार चाचणी घेतली गेली. तसेच आयओएसीपद्धतीनुसार भौतिक, रासायनिक गुणधर्म आणि साठवण कालावधी तपासण्यात आला. चाचणीसाठी तीन टक्के ॲसिटिक अॅसिड (सिम्यूलंट बी) वापरण्यात आले..Bio Pesticide Conference: ‘राष्ट्रीय जैव कीटकनाशक परिषदे’चे आसाम कृषी विद्यापीठात आयोजन.संशोधन प्रयोगाचे टप्पे पारंपरिक पेट्रोकेमिकल प्लॅस्टिकला पर्याय म्हणून जैवविघटनशील प्लॅस्टिक ही संकल्पना आता जागतिक पातळीवर महत्त्वाची बनली आहे. जैवविघटनशील प्लॅस्टिक निर्मितीसाठी साधारणतः ५० टक्के प्रमाणात स्टार्च वापरला जातो. यासाठी कसावा, टॅपिओका, मका, भातामधील स्टार्च या घटकांचे विविध प्रमाणात ब्लेंड करून जैवविघटनशील प्लॅस्टिक फिल्म तयार करण्यात येते..संशोधन प्रयोगामध्ये कसावामधील स्टार्च या घटकांचे विविध प्रमाणात मिश्रण करून जैवविघटनशील फिल्म तयार करण्यात आली. या फिल्मचे भौतिक व यांत्रिक गुणधर्म, जसे की ताणण्याची क्षमता, जाडी, पारदर्शकता, पाणी शोषण, आर्द्रता पारगम्यता तपासण्यात आली.तयार झालेल्या फिल्मचा अन्न पॅकेजिंगसाठी योग्यतेचा अभ्यास करण्यात आला. उदा. अन्नपदार्थांचा (बिस्कीटे, चिप्स, केचप आणि जेली इत्यादी) साठवण कालावधी तपासण्यात आला..Bio Stimulant Ban: कृषी मंत्रालयाने धार्मिक कारणांमुळे ११ प्राणीजन्य जैव-उत्तेजकांची वेसण आवळली.बिस्किटे, चिप्स, केचप आणि जेली हे पदार्थ विकसित जैवविघटनशील फिल्ममध्ये सहा महिन्यांपर्यंत खोलीच्या तापमानावर साठविण्यात आले. त्यांच्या भौतिक,रासायनिक गुणधर्मांचे विश्लेषण करण्यात आले.या फिल्मची मातीतील विघटनशीलता आणि पर्यावरणीय अनुकूलता यांचा प्राथमिक अभ्यास करण्यात आला.विविध अभ्यासानंतर असे दिसून आले, की या प्रकारची फिल्म पारंपरिक प्लॅस्टिक फिल्मसाठी पर्याय म्हणून उपयोगी ठरू शकते. याचा वापर पॅकेजिंग उद्योगात करणे शक्य आहे. या फिल्मची भौतिक, यांत्रिक गुणवत्ता तसेच अन्नपॅकेजिंगसाठी योग्यता तपासणी करण्यात आली..Bio-Plastic : प्लॅस्टिकला पर्याय बायोप्लॅस्टिकचा.अनुमान आणि शिफारस संशोधनातून विकसित झालेल्या ब्लेंड फिल्म वापर हा नवीन पर्यावरणपूरक पॅकेजिंग साहित्य विकसित करण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे अन्नाची साठवण क्षमता नियंत्रित ठेवणे, फिल्मचे स्थैर्य व अन्नपदार्थाची गुणवत्ता, टिकवण क्षमता चांगल्या प्रकारे राहते. त्यामुळे बिस्किटे, चिप्स, केचप इत्यादी अन्नपदार्थांसाठी अशा जैवविघटनशील फिल्मचा वापर योग्य आहे.मोठ्या प्रमाणावर उद्योगात वापरण्यापूर्वी जास्तीचा साठवण कालावधी, विविध तापमान/ आर्द्रता परिस्थिती, विविध अन्नपदार्थांसह तपासणी आवश्यक आहे..फिल्म निर्मितीचा आर्थिक व उत्पादनक्षमतेचा अभ्यास गरजेचा आहे.जैवविघटन क्षमतेचा अभ्यास (उदा. माती, पर्यावरणीय परिस्थितींमध्ये) विस्तृत स्वरूपात करावा लागेल.मिश्रणातील स्टार्च प्रमाण वाढल्यामुळे पाणी शोषण व आर्द्रता पारगम्यता वाढण्याची प्रवृत्ती दिसली. कारण स्टार्च हायड्रॉफिलिकधर्मी आहे. त्याचे हायड्रॉक्सिल गट पाण्याशी जोडले जातात..फिल्मची तन्यता थोडी कमी आढळली, तरी पॅकेजिंगच्या दृष्टीने वापरासाठी पुरेशी असल्याचे दिसते.फिल्ममधील साठवण क्षमता नियंत्रित मर्यादेत दिसली, म्हणजेच अन्नपदार्थासाठी सुरक्षित पद्धतीने वापर शक्य आहे. .पर्यावरणदृष्ट्या विचार करता, पारंपरिक प्लॅस्टिकचा पर्याय म्हणून ही फिल्म योग्य ठरू शकते. मात्र उद्योगस्तरावर मोठ्या प्रमाणावर उपयोगासाठी खर्च, साठवण वातावरण, विविध अन्नप्रकारांसाठी उपयुक्तता या बाबींचा अभ्यास करणे गरजेचे आहे.तयार केलेली कसावा स्टार्च मिश्रित जैवविघटनशील फिल्म अन्नपॅकेजिंगसाठी सुरक्षित, उपयुक्त व पर्यावरण-अनुकूल आहे. हे पारंपरिक प्लॅस्टिक फिल्मसाठी संतुलित पर्याय शक्य आहे. या तंत्रज्ञानाचे पेटंट घेण्यात आले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.