Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा मोहर करपल्यानंतर आता काजूचा मोहरदेखील करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काजू उत्पादक हवालदिल झाले आहेत. सततच्या धुक्याचा हा परिणाम मानला जात आहे. दरम्यान, मोहर करपल्याने जिल्ह्यात केवळ २५ टक्केच उत्पादन मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे..जिल्ह्यातील आंबा पिकाला आलेल्या मोहरापैकी सुमारे ९० टक्के मोहर करपला असून, केवळ दहा टक्के फळधारणा झाली आहे. त्यामुळे आंबा उत्पादक आर्थिक संकटात आले आहेत. आंब्यापाठोपाठ आता काजू उत्पादकांवरही संकटाची चिन्हे दिसू लागली आहेत. सततच्या धुक्याचा पिकाला मोठा फटका बसू लागला आहे..Cashew Farming: नियोजनबद्ध काजू हंगामासाठी प्रयत्न.अनेक शेतकऱ्यांनी मोहर टिकविण्यासाठी कीटकनाशके व बुरशीनाशकांच्या फवारण्या केल्या; मात्र तरीदेखील मोहर करपत असल्याने बागायतदार हैराण झाले आहेत. कोवळी बी देखील काळवंडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काजू उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत..Cashew Farming: काजू पिकातून आर्थिक प्रगतीची संधी ः डॉ. मोहिते.आंबा पीक जिल्ह्याच्या किनारपट्टी व काही भागांत आहे; परंतु काजू पीक जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत घेतले जाते. ७९ हजार हेक्टरवर काजू पिकाची लागवड असून, त्यापैकी ७२ हजार हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे..अनेक शेतकऱ्यांनी चार-चार फवारण्या केल्या असून, लाखो रुपये खर्च केले आहेत. काजू उत्पादनच मिळाले नाही तर शेतकरी अडचणीत येणार आहेत. धुक्यामुळे मोहर करपत असतानाच काजू बी पोखरणारी अळी व फुलकिड्यांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे काजू पिकात देखील केवळ वीस ते पंचवीस टक्केच उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.