Livestock Management: सातबाराशी संबंध आलेल्या प्रत्येकाचा बैल आणि गाई-गुरं यांच्याशी भावनिक नातं असतंच. पण नुसत्याच भावनिक उमाळ्यांनी जग चालत नाही. शेतीचा कारभार हाती आला असता आता बापाचं अर्थकारण कळायला लागलंय. उत्पन्न आणि मजुरीचा ताळमेळ लावता लावता होणारी दमछाक बापाबद्दल अजून आदर निर्माण करतीय. दावणीला दोन बैल आणि इतर चार-दोन गुरं सांभाळण्यासाठी लागणारी मजुरी, चाऱ्याचा खर्च वगैरे याचा लेखाजोखा काढला असता घर विकून चौकट गळ्यात यायची वेळ आली आहे.