Maharashtra Election 2024 : मतदारांतील ‘सुप्त’लाटेची उमेदवारांना धास्ती

Assembly Election Voting : यंदा विधानसभा निवडणूकीत ‘सुप्त लाट’ असल्याच्या चर्चेने आणि मतदारांच्या सावध भूमिकेमुळे मतदान एक दिवसावर आलेले असतानाही उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विजयाची खात्री पटेना.
Maharashtra Assembly Elections 2024
Maharashtra Assembly Elections 2024Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : यंदा विधानसभा निवडणूकीत ‘सुप्त लाट’ असल्याच्या चर्चेने आणि मतदारांच्या सावध भूमिकेमुळे मतदान एक दिवसावर आलेले असतानाही उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना विजयाची खात्री पटेना. यंदा ‘सुप्त लाट’ असल्याच्या चर्चेची सर्वच उमेदवारांनी धास्ती घेतली आहे. ‘सुप्त लाट, कोणाची वाट लावतेय’ हे पाच दिवसांतच कळणार आहे.

राज्यातील २८८ मतदार संघांत विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (ता. २०) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गेल्या तेरा चौदा दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सोशल वार, नेत्यांच्या सभा, जागोजागी बॅनरबाजी, आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांचे उणेदुणे काढण्याची रणधुमाळी सोमवारी (ता. १८) संपली. मात्र तेरा-चौदा दिवसांतही यंदा लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही नेमका ‘कल’ कळायला तयार नाही.

यंदा लोकसभेला मतदारांचा ‘अबोला’ अनुभवला, तोच अनुभव विधानसभेला येत आहे. काही मोजके, उत्साही लोक वगळले तर सामान्य मतदार स्पष्टपणे बोलले नाहीत. कधीकाळी समूह मतदानातून बाजू समजायची, मात्र आता माध्यमे, सोशल मीडियाच्या प्रभावामुळे घराघरात मतमतांतरे तयार होत आहेत.

Maharashtra Assembly Elections 2024
Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीत ‘खटाखट’ गाजरांचा पाऊस

त्यामुळे ‘हवा कोणाची’ याबाबत कल काढण्याच्या कामात असलेल्यांची मोठी अडचण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नेत्यांच्या सभा, रॅलीला पाचशे-हजार रुपये देऊन लोक आणले गेले. त्यामुळे सभा, रॅलीला गर्दी जमली तरी अंदाज काढता आला नाही. अहिल्यानगर जिल्ह्यात यावेळी केवळ राजकीय जाणकार म्हणतात सुप्त लाट आहे.

Maharashtra Assembly Elections 2024
Maharashtra Election 2024 : प्रचाराच्या धुराळ्यात हरवले शेतकऱ्यांचे प्रश्‍न

मात्र ही सुप्त लाट कोणाची, त्याचा फटका कोणाला बसणार याबाबत भल्याभल्यांचे अंदाज फेल जात असल्याचे पाहायला मिळत आहे. नेते, कार्यकर्त्यांकडून सर्व साधनांचा वापर करत अक्षरशः एका-एका मतदारांचे मने वळवण्याचा प्रयत्न शेवटच्या दिवसापर्यंत सुरू आहे.

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सुप्त लाट असल्याचे अनेकांचे म्हणणे असून मतदारांची सुप्त लाट कोणाची वाट लावणार हे पाच दिवसांत दिसणार आहे. निवडणुकीच्या आखाड्यात असलेल्या सर्वच पक्षांच्या उमेदवारांची भूमिका, आधी आमदार असतील तर त्यांचे पाच वर्षांतील काम आणि सरकारच्या एकदंर बाबीविषयी मतमतांतरे निर्माण होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com