Yavatmal News: एकेकाळी जिल्ह्यात नावलौकिक कमावलेली पुसद बाजार समिती मागील दोन दशकांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सध्या समितीतील कर्मचारी सचिवांसह साखळी उपोषणावर बसले असून, आंदोलनाला पाच दिवस उलटूनही कोणताही तोडगा न निघाल्याने बाजार समितीचे कामकाज ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. .लिलाव प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा देत आज (ता.२श्र) व्यवहार पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थकीत वेतनाच्या मुद्द्यावरून यापूर्वीही कर्मचारी उपोषणाला बसले असता त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले होते..Pusad APMC : पुसद बाजार समितीच्या ९ संचालकांचे राजीनामे .मात्र ते आश्वासन प्रत्यक्षात न उतरल्याने कर्मचाऱ्यांना पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले आहे. कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक महिन्यांपासून पगार थकला असून पगारातून कपात करण्यात येणारा भविष्य निर्वाह निधी (पीएफ) २०१५ पासून नियमितपणे भरलेला नाही..Pusad APMC : पुसद बाजार समितीचे कर्मचारी आर्थिक विवंचनेत .आज लिलाव बंदसाखळी उपोषणाला लिलाव प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांचा पाठिंबा मिळाल्याने बुधवारी (ता. २८) व्यवहार पूर्णतः ठप्प राहणार आहेत..कै. वसंतराव नाईक आणि कै. सुधाकरराव नाईक यांसारख्या शेतकऱ्यांचा कैवार घेणाऱ्या महापुरुषांच्या भूमीतच बाजार व्यवस्था मोडकळीस येणे ही दुर्दैवी बाब आहे. नेत्यांच्या खाऊ वृत्तीमुळे हा प्रकार घडला असून लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.- मनीष जाधव, प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना.२०२१ ते २०२३ या कालावधीत प्रशासक असलेल्या सचिवाने गैरकायदेशीरपणे आठ पदे भरली. यामध्ये त्यांच्या बहुतांश नातेवाईकांचा समावेश आहे. त्यामुळे प्रशासकीय खर्च वाढला असून तुलनेत उत्पन्न कमी आहे. ९३ लाख रुपये उत्पन्न आणि ९१ लाख रुपये प्रशासकीय खर्च असल्याने बाजार समितीचा डोलारा कोसळला आहे. त्यातूनच ही स्थिती उद्भवली. या संदर्भातील याचिका विरोधात जाण्याच्या भीतीने हे आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे.- शेख कौसर, सभापती, बाजार समिती, पुसद.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.