Akola News : बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील थड येथील तक्रारदाराची वर्ग-२ मधील जमीन वर्ग-१ करण्यासाठी तहसीलदार हेमंत भागवत पाटील (वय ४४, रा. भराडी, जि. जळगाव) याने तब्बल २ लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. .रविवारी (ता.१४) अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करीत त्याला अटक केली. प्रती एकर ५० हजार रुपयांप्रमाणे एकूण ४ एकर जमिनीबाबत तहसीलदाराने दोन लाखांची मागणी केली होती..Akola Bribery Case : नायब तहसीलदार बळीराम चव्हाण लाचप्रकरणात अटकेत .अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार कारवाईत तहसीलदार पाटील यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. रविवारी बुलडाणा येथील रामलक्ष्मी नगर, गायकवाड ले-आउट, क्रीडा संकुल रोड येथे लाच स्वीकारत असतानाच पथकाने त्यांना रंगेहात पकडले. .Agri Officers Bribery : कृषी केंद्र व्यावसायिकांकडून वसुली .शौचालयात पैसे फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नलाच स्वीकारल्यानंतर कारवाईची चाहूल लागताच तहसीलदाराने २ लाखांची रक्कम शौचालयात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फसला. या प्रकरणी बुलडाणा (शहर) पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. .या कारवाईने महसूल यंत्रणेतील पारदर्शक कारभाराचे वाभाडे निघाले आहेत.या कारवाईत पोलिस अधीक्षक मारूती जगताप, अपर पोलिस अधीक्षक सचिंद्र शिंदे व उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अतुल इंगोले, अंमलदार दिगांबर जाधव, अविनाश पाचपोर, गोपाल किरडे, संदीप ताले, असलम शहा, नीलेश शेगोकार, अर्चना घोडेस्वार व नफिस यांनी सहभाग घेतला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.