Buldhana News: ग्रामीण भागात जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे गावे आता पाणीपुरवठा योजनांच्या संचालन, देखभाल व दुरुस्तीच्या महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश करत आहेत. या योजना हस्तांतरासाठी ८ ते २२ मार्चदरम्यान जलअर्पण दिवस साजरा करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी निर्देश दिले..योजना पूर्ण झाल्यानंतर त्यांचे हस्तांतरण पारदर्शकपणे, स्पष्टतेने आणि सामायिक अभिमानाने होणे आवश्यक आहे. हस्तांतरणानंतर पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी ग्रामपंचायत, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती तसेच ग्रामस्थांवर येणार आहे. या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातही हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जाणार आहे..Jal Jeevan Mission 2026: स्वच्छ पाण्यासाठी आता होणार ‘जल सेवा आकलन’.या कालावधीत ‘हर घर जल’ घोषित व योजना हस्तांतरित झालेल्या गावांमध्ये जल अर्पण दिवस साजरा केला जाणार आहे..Jal Jeevan Mission: ‘हर घर जल’ योजनेचा बोजवारा.जल अर्पण दिवसानिमित्त ग्रामसभा, पीआरए उपक्रम, फिल्ड टेस्ट किटचे प्रात्यक्षिक आयोजित केले जाणार आहे. तसेच बचत गट सदस्य, आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक, युवक यांचा सुरक्षित पाणी व्यवस्थापनात सहभाग घेतला जाणार आहे..आयोजनामागील भूमिकाजल अर्पण दिवसाचा मुख्य उद्देश पाण्याबाबत कृतज्ञता व्यक्त करणे हा आहे. या दिवशी शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, महिलांचा सक्रिय सहभाग, जल प्रतिज्ञा, जल पूजन तसेच पाणी संवर्धनाबाबत मार्गदर्शन असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत, असे निर्देश खरात यांनी दिले आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.