Farm Road Access: चिखली तहसील प्रशासनाने ग्रामीण भागातील नागरिकांच्या दळणवळणाच्या समस्यांवर प्रभावी तोडगा काढत ‘रस्ते मोकळे’ मोहिमेला गती दिली आहे. एकाच दिवशी तीन प्रलंबित शेतरस्ते खुली करून प्रशासनाने तिहेरी यश संपादन केले असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे..मौजा महीमळ येथे अनेक वर्षांपासून रखडलेला सुमारे ०.५ किलोमीटर लांबीचा शेतरस्ता तहसीलदार विजय सावडे यांच्या मार्गदर्शनाखाली खुला करण्यात आला. नायब तहसीलदार, ग्राम महसूल अधिकारी रजनी देशमुख, सरपंच पार्वताबाई खंबाईतकर, पोलिस पाटील आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने जेसीबीच्या साहाय्याने हा मार्ग मोकळा करण्यात आला. या रस्त्यामुळे सुमारे ६० ते ७० नागरिकांचा प्रवास सुलभ झाला आहे..Farm Road Development: पाणंद रस्त्याच्या कामांना मिळणार गती.तसेच मौजा करतवाडी येथे करतवाडी ते अशोक सपकाळ यांच्या शेतापर्यंतचा अंदाजे १ किलोमीटर लांबीचा रस्ता तातडीने खुला करण्यात आला. या मोहिमेत भूमी अभिलेख कार्यालयातील श्री. खेडकर, ग्राम महसूल अधिकारी रजनी देशमुख आणि स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग होता. या रस्त्याचा थेट लाभ सुमारे २२५ नागरिकांना झाला..Farm Road Development: पाणंद रस्त्याच्या कामांना मिळणार गती. याशिवाय मौजे बाभूळगाव, सावरखेड व बुद्रुक परिसरातील सुमारे २.५० किलोमीटर लांबीचा शिवरस्ता मोकळा करत प्रशासनाने अचूक नियोजन आणि तत्पर निर्णयक्षमता दाखवली. .भूमिअभिलेख विभागातील श्री. खेडकर यांनी मोजणी करून मार्ग आखला, तर ग्राम महसूल अधिकारी अर्चना बाहेकर, रजनी देशमुख, मोरे आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सर्व अडचणी जागेवरच सोडवण्यात आल्या. या रस्त्यामुळे १०० ते १२० नागरिकांना फायदा झाला आहे.या सलग आणि परिणामकारक कारवाईमुळे दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लागले असून ग्रामीण दळणवळण व्यवस्थेला नवी चालना मिळाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.