Agriculture Irrigation Schemes Delay: शेती उत्पादन वाढविण्यासाठी आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचनाला मोठे महत्त्व आहे. मात्र शासनाच्या विविध योजनांतर्गत सिंचन साहित्य खरेदीसाठी आवश्यक असलेली पूर्वसंमती मागील सहा महिन्यांपासून मिळत नसल्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. हंगाम सुरू झाला असतानाही अर्ज मंजूर न झाल्याने शेतकऱ्यांचे सिंचनाचे नियोजन रखडले आहे..कमी पाणी असलेल्या भागात ठिबक आणि तुषार सिंचन संचामुळे योग्य वापर करता येतो. कमी पाण्यात अधिक क्षेत्राला पाणी देता येते. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करतात. मात्र अर्ज दाखल करूनही पूर्वसंमती मिळण्यास होत असलेल्या विलंबामुळे शेतकऱ्यांना साहित्य खरेदी करता येत नाही. काही शेतकऱ्यांनी विक्रेत्यांशी संपर्क साधून संच उपलब्ध करून ठेवण्याची तयारी केली होती. मात्र शासकीय प्रक्रियेत विलंब झाल्याने योग्य वेळी सिंचन सुविधा उभारता येत नसल्याने आगामी काळात उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..Drip Irrigation Subsidy: ‘ठिबक’ अनुदानापोटी २०८ कोटी जमा होणार.दरम्यान, कृषी यांत्रिकीकरणाचीही अशीच स्थिती आहे. योजनेतील ट्रॅक्टर अनुदानाचाही प्रश्न कायम आहे. काही शेतकऱ्यांनी सहा महिन्यांपूर्वी कर्ज काढून किंवा स्वतःची आर्थिक जुळवाजुळव करून ट्रॅक्टरची खरेदी केली आहे. आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करूनही अद्याप अनुदानाची रक्कम मिळालेली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. ट्रॅक्टर खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने अनुदान रखडल्यामुळे कर्जाचा भार वाढत असल्याचे शेतकरी सांगतात..Drip Irrigation Project: ढिवरवाडी सिट्रस इस्टेटमध्ये अखेर लागणार ड्रीप.शासनाच्या कृषी योजनांचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे आणि शेतीचा खर्च कमी करणे हा आहे. मात्र मंजुरी व अनुदान वितरणातील विलंबामुळे या योजनांचा अपेक्षित लाभ वेळेत मिळत नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे. .प्रलंबित अर्जांना तातडीने पूर्वसंमती देऊन ठिबक, तुषार संचासाठीची प्रक्रिया पूर्ण करावी तसेच ट्रॅक्टरसह अन्य कृषी यंत्रसामग्रीचे रखडलेले अनुदान तत्काळ वितरित करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे..नोव्हेंबर २०२५ पासून अर्ज प्रलंबितमेरा (ता. चिखली) येथील विद्या रामेश्वर पडघान यांनी एक हेक्टर क्षेत्रासाठी तुषार संच घेण्याचे ठरवत अर्ज केला. यासाठी संबंधित कंपनीचे कोटेशनही घेतले. मात्र अद्याप त्यांच्या अर्जाला पूर्वसंमतीच मिळालेली नाही. महाडीबीटी वेबपोर्टलवर या अनुषंगाने कुठलीही हालचाल झालेली. लिंबाजी लखाडे यांनी खरेदी केलेल्या ट्रॅक्टरचे अनुदानही सहा महिन्यांपासून खात्यात जमा झालेले नाही. असे असंख्य शेतकरी सध्या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.