District Bank Election News: बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची निवडणूक आता चांगलीच रंगतदार झाली आहे. २१ पैकी १२ जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित ९ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वपक्षीय नेत्यांच्या ‘सहकार’ पॅनेल विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदरा मनोज कायंदे यांनी ‘अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनेल’ मैदानात उतरविल्याने बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न फसले आहेत. .उर्वरित जागांसाठी रविवारी (ता. २३) मतदान होणार आहे. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार’ पॅनेल विरोधात हे पॅनेल निवडणूक लढवत आहे. आमदार कायंदे यांनी पत्रकार परिषदेत पॅनेलची घोषणा केली..Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर.जिल्हा बँक आर्थिक अडचणीत असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३०० कोटी रुपयांचे सुलभ कर्ज उपलब्ध करून दिल्याने बँकेला उभारी मिळाली. सध्या बँक सुमारे २४ कोटी रुपयांच्या नफ्यात आली असतानाही अजित पवार यांच्या विचारांच्या कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्व नाकारण्यात आल्याची खंत कायंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली..नऊ जागांसाठी २३ उमेदवारमहिला राखीव दोन जागांसाठी पाच, ओबीसी एका जागेसाठी चार, अनुसूचित जाती एका जागेसाठी दोन आणि इतर संस्था मतदारसंघाच्या एका जागेसाठी दोन उमेदवार आहेत. वैयक्तिक मतदारसंघात विद्यमान आमदार चैनसूख संचेती विरुद्ध ज्ञानेश्वरदादा ऊर्फ नाना पाटील अशी प्रतिष्ठेची लढत होत आहे. लोणार ग्रामसेवा मतदारसंघात दोन, संग्रामपूरमध्ये तीन, तर मलकापूर ग्रामसेवा मतदारसंघात तीन उमेदवार आमनेसामने आहेत. यात काही बंडखोर तसेच अजित पवार गटाशी संबंधित उमेदवारांचाही समावेश आहे..Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी.१२ उमेदवार बिनविरोधमेहकर ग्रामसेवा मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पणन मतदारसंघातून कामगार मंत्री आकाश फुंडकर, सिंदखेडराजा ग्रामसेवा मतदारसंघातून डॉ. राजेंद्र शिंगणे, मोताळा ग्रामसेवा मतदारसंघातून आमदार संजय गायकवाड बिनविरोध निवडून आले आहेत..तसेच बुलडाणा येथून मयूर बाहेकार, चिखलीतून अंकुशराव पाटील, शेगावमधून पांडुरंगदादा पाटील, देऊळगावराजा येथून कावेरी सोनसळे, जळगाव जामोद येथून प्रसेनजीत पाटील, खामगाव येथून दिनेश काळणे, नांदुरा येथून राजेश देशमुख आणि व्हीजेएनटी मतदारसंघातून जालिंदर बुधवंत यांची बिनविरोध निवड झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.