Nashik News: किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने यंदा ३ लाख टन कांद्याची खरेदी केली आहे. एकीकडे प्रतिकूल परिस्थितीत कांदा उत्पादन घेतलेले असताना सध्या बाजारात कांद्याला अपेक्षित दर नाही. तर किरकोळ विक्रीत कांद्याची दरवाढ तसेच ओरड नसताना ‘बफर स्टॉक’मधील हा कांदा बाजारात आणण्यास केंद्राने सुरुवात केली आहे. मुंबई, दिल्ली व अहमदाबादमध्ये प्रति किलो २४ रुपये प्रमाणे विक्रीला सुरुवात झाली आहे..केंद्र सरकारने महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांतून ३ लाख टन रब्बी कांद्याची खरेदी सहकारी संस्था व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून केली आहे. या कांद्याच्या खरेदीतील गैरव्यवहारांची चर्चा सुरू आहे. तर दोन महिन्यांपूर्वी झालेल्या खरेदीचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत..Onion Pending Payment: ‘नाफेड’, ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदीची रक्कम लवकर द्या.अशातच गुरुवारी (ता. ४) केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते २४ रुपये प्रति किलो दराने किरकोळ विक्रीला सुरुवात झाली. केंद्र शेतकरी आणि ग्राहक कल्याणासाठी वचनबद्ध आहे, अन्नधान्य महागाई नियंत्रणात ठेवणे हे सरकारचे प्राधान्य आहे. गेल्या महिन्यात महागाई दर कमी करण्यात किंमत स्थिरीकरण उपायांद्वारे विविध थेट हस्तक्षेपांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे श्री. जोशी या वेळी म्हणाले..दिल्लीत नाफेड, एनसीसीएफ व केंद्रीय भंडार यांच्या माध्यमातून १६१ विक्री केंद्रांवर, मुंबईत १८ आणि अहमदाबादमध्ये १० ठिकाणी विक्री सुरू आहे. नाफेड, एनसीसीएफ व केंद्रीय भंडार यांचे विक्री केंद्र तसेच मोबाइल व्हॅन, नाफेड, एनसीसीएफ यांच्या वितरण भागीदारामार्फत किरकोळ विक्री केली जाणार आहे. दरात वाढ होईल तसा कांदा बाजारात आणला जाणार आहे. दिल्लीसाठी मध्य प्रदेशातून तर मुंबईसाठी नाशिकमधून कांद्याचे ट्रक पाठवल्याची माहिती समोर येत आहे..Kharif Onion Cultivation: खरीप कांदा लागवड क्षेत्रात ५० टक्क्यांनी घट.कांद्याच्या मुद्द्यावर दलाली नकोएका बाजूला शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करायचा, दोन महिन्यांपासून त्यांचे पैसे थकवायचे. ग्राहकांची ओरड नसताना तोच कांदा बाजारात ओतायचा हे सरकारचे धोरण शेतकरीविरोधी आहे. १४ ते १६ रुपये किलोप्रमाणे कांदा खरेदी करून सरकार दोन महिन्यांत २४ रुपयांप्रमाणे बाजारात विक्री करत आहे..सरकार शेतकऱ्यांसाठी आहे की नफा कमविण्यासाठी हेच कळेना झाले. सरकारने आता ही दलाली बंद करावी. विक्री करायची असेल तर खरेदी केलेल्या कांद्याची किंमत, हाताळणी व वाहतूक खर्च यातून उरणारी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली..शेतकऱ्यांचे नुकसान होईल असे धंदे केंद्र सरकारने करू नयेत. आधीच शेतकऱ्यांना बाजारात स्पर्धात्मक दर नसल्याची स्थिती आहे. केंद्राने दीड महिन्यापूर्वी कांदा खरेदी करून ग्राहकांची ओरड नसताना बाजारात ओतला आहे. ही शेतकरी व ग्राहक दोघांचीही दिशाभूल आहे. मात्र खरेदीतील भ्रष्टाचार दाबण्यासाठी ही घाईने विक्री सुरू केली आहे. सरकारने ती तत्काळ थांबवावी, सखोल चौकशी करावी. आधी शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर वर्ग करावेत.अनिल घनवट, अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.