- डाॅ. विलास भालेपशुधन, पशू चिकित्सालय आणि मत्स्य उद्योग वाढीसाठीही अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद केली असून, त्यातून ग्रामीण रोजगार निर्मितीस चालना मिळू शकेल. ही तरतूद थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम करेल. मात्र, काही बाबींमध्ये अपेक्षित धोरणात्मक तरतुदींचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष जीवनमान सुधारण्याची शक्यता मर्यादित राहते..साडेपाच लाख कोटी रुपयांचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना कृषी व तत्सम उद्योगांसाठी १.६३ लाख कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. ती मागील वर्षाच्या १.३७ लाख कोटींपेक्षा अधिक आहे. गेल्या वर्षाची तुलनेमध्ये तीन टक्के वाढ दैनंदिन कृषी व ग्रामीण क्षेत्रासाठी सकारात्मक पाऊल ठरू शकते. मात्र, काही बाबींमध्ये अपेक्षित धोरणात्मक तरतुदींचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष जीवनमान सुधारण्याची शक्यता मर्यादित राहते..Union Budget 2026 : केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाट्याला काय आले?.यंदाच्या अर्थसंकल्पात औद्योगिक वाढीसाठीही विशेष भर दिला गेला आहे. लघु व मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. या निधीमुळे कृषीविषयक लघु व मध्यम उद्योगांना आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण उद्योगांना ही तरतूद उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी, तंत्रज्ञान सुधारण्यासाठी व व्यवसायातील स्पर्धात्मकता टिकवण्यासाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे शेतकरी-उद्योजकांना स्वतःचे उत्पादन व विपणन सुलभ करण्याची संधी मिळेल..पशुधन, पशू चिकित्सालय आणि मत्स्य उद्योग वाढीसाठीही अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद केली असून, त्यातून ग्रामीण रोजगार निर्मितीस चालना मिळू शकेल. ही तरतूद थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम करेल. वस्त्रोद्योगासाठी ७ हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. यामुळे वस्त्रोद्योग अधिक उत्पादनक्षम व स्पर्धात्मक होईल. ग्रामीण महिलांच्या स्वरोजगारासाठी संधी निर्माण होण्याचीही अपेक्षा आहे. त्याचबरोबर कापूस शेतकऱ्यांनाही लाभ होईल. रासायनिक उत्पादने, खनिज क्षेत्रातील गुंतवणूक, तसेच नव्या कॉरिडोरमुळे रोजगाराच्या संधी वाढतील. त्या त्या भागात औद्योगिक वृद्धीला चालना मिळेल..Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प.याव्यतिरिक्त, बायोफार्म उद्योगांसाठी शिक्षण व संशोधनासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित आहे. सात हायस्पीड कॉरिडोर, २२ जलमार्ग आणि ५ लाख लोकसंख्येच्या शहरांचा विकास यावरही या अर्थसंकल्पात विशेष भर दिलेला आहे. यामुळे वाहतूक, वितरण आणि व्यापार व्यवस्थेत सुधारणांची शक्यता आहे. ‘एआय’च्या माध्यमातून कौशल्य विकासाची संधी उपलब्ध होऊ शकते. त्याचा फायदा शेतकरी व उद्योजकांना आपल्या उत्पादन, विपणन व व्यवस्थापन प्रक्रियेत सुधारणेसाठी होऊ शकतो..शेतीविषयक फळ पिकांसाठी काजू, कोको, नारळ, बदाम, अक्रोड यांसारख्या पिकांसाठी विशेष निधी प्रस्तावित केला आहे. या तरतुदीमुळे या फळ पिकांचे उत्पादन व विपणन सुधारण्यास मदत होईल. तथापि महाराष्ट्रातील मुख्य पिके केळी, कापूस, सोयाबीन, तृणधान्ये यांसाठी कोणतेही विशेष उल्लेख किंवा आर्थिक तरतूद दिसत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या या प्रमुख पिकांच्या उत्पादन व आर्थिक वाढीसाठी अपेक्षित मदत मिळण्याची शक्यता मर्यादित आहे. मागील वर्षी अजेंड्यावर घेतलेले सेंद्रीय व नैसर्गिक शेती सारखे विषय आणि उपकरणे, आधुनिकीकरण, ग्रामीण शेती उद्योग प्रक्रिया आणि व्यापारी हब यासंबंधी विसर पडल्याने काहीही ठोस तरतुदी दिसत नाहीत..विद्यापीठ संशोधन, शैक्षणिक गुणवत्ता व रोजगार निर्मिती यावरही यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष लक्ष दिलेले नाही. कृषी संशोधन व शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी अपेक्षित तरतुदींचा अभाव भविष्यातील ग्रामीण व कृषी विकासासाठी चिंता निर्माण करतो. शेतकऱ्यांना स्थिर मोबदला मिळेल, यासाठी उपायांची आवश्यकता आहे. परंतु त्यासाठी व्यवहारात तत्काळ व ठोस अंमलबजावणी आवश्यक आहे..एकूणच, या अर्थसंकल्पातून कृषी व ग्रामीण उद्योगांमध्ये काही प्रमाणात सुधारणा अपेक्षित आहे. लघू-मध्यम उद्योग, फळपिके, पशुधन व मत्स्य उद्योग, वस्त्रोद्योग या क्षेत्रांना आर्थिक मदत मिळण्याची शक्यता आहे. तथापि महाराष्ट्रातील प्रमुख पिके व सेंद्रीय शेतीसाठी प्रत्यक्ष मदत, संशोधन व रोजगार निर्मितीसाठी ठोस उपायांचा अभाव दिसतो. एकंदरीत, केंद्रीय अर्थसंकल्पाने कृषी क्षेत्र व ग्रामीण उद्योगांना चालना देण्यासाठी काही सकारात्मक पावले उचलली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील मुख्य पिके, सेंद्रीय शेती, उपकरणे, संशोधन व रोजगार निर्मितीसाठी अपेक्षित तरतुदींचा अभावामुळे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरण्यामध्ये अनेक मर्यादा येणार आहेत. भविष्यातील धोरणात्मकसुधारणा, ग्रामीण उद्योगांचे आधुनिकीकरण व प्रमुख पिकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी अधिक सखोल व ठोस उपायांची गरज आहे.माजी कुलगुरु, डॉ. पंजाबराव देशमुखकृषी विद्यापीठ, अकोला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.