Budget Agriculture Allocation: नाशिक : हवामान बदलाच्या संकटात पिकांचे नवीन वाण विकसित करण्यासाठी संशोधनाची नितांत गरज आहे. मात्र, केंद्र सरकारने अर्थसंकल्पात कृषी शिक्षण आणि संशोधनाच्या तरतुदीतच मोठी कपात केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ 'महागडे पॅकिंग करून जुना माल विकण्याचा प्रकार आहे, अशी टीका दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी केली आहे. यासह द्राक्ष-कांदा पट्ट्यात असंतोष असून उत्पादन खर्चही न निघाल्याने उत्तर महाराष्ट्रातील अर्थकारण कोलमडल्याची खंत त्यांनी मांडली..नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर संसदेत बोलताना खा. भगरे यांनी कृषी क्षेत्राच्या उपक्षेवर बोट ठेवले. देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी नेहमीच कृषी संशोधनाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यातूनच देशाला शेतीसाठी नवा विचार व दृष्टिकोन मिळाला, ज्यामुळे कृषी उत्पादनात विक्रमी वाढ झाली. मात्र, विद्यमान सरकारला या दूरदृष्टीचा विसर पडल्याचे चित्र आहे..Parliament Budget Session: मोदी सरकारनं भारतमाता अन् शेतकऱ्याला विकलं; भारत-अमेरिका करारावरुन राहुल गांधींचा हल्लाबोल.हवामान बदलाचे संकट आणि संशोधनाची गरजखासदार भगरे म्हणाले, की गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा वाढला आहे. मागील वर्षी मे ते ऑक्टोबर अशा दीर्घकाळ चाललेल्या पावसामुळे ओला दुष्काळ पडला. यात नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा, द्राक्ष, टोमॅटो, भात आणि सोयाबीन पिके मातीमोल झाली. अशा परिस्थितीत हवामान बदलावर मात करणारे नवीन वाण विकसित करणे गरजेचे होते. पण संशोधनालाच पैसे नसतील, तर शेती आणि शेतकरी कसा तरेल? शेतीला नवी दृष्टी कशी मिळणार?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला..Union Budget 2026: मोठ्या घोषणा, अल्प निधी!.कांदा, द्राक्ष उत्पादकांचा भ्रमनिरास दिंडोरी मतदारसंघातील प्रमुख पिकांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधताना ते म्हणाले की, सध्या कांद्याला ८०० ते १००० रुपये भाव मिळत असून यात उत्पादन खर्चही निघत नाही. द्राक्ष शेती तर प्रचंड धोक्यात आली आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला असताना, अर्थसंकल्पातून कर्जमाफीची अपेक्षा होती. मात्र भ्रमनिरास झाला आहे, असे मत भगरे यांनी मांडले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.