Akola News: बी.एस्सी. अॅग्रीच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून, या वर्षी विद्यार्थ्यांसह पालकांचा या शिक्षणक्रमाकडे लक्षणीय ओढा वाढल्याचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे. कृषी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी, उद्योजकता आणि शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची जाण या सर्व कारणांमुळे विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणावर कृषी शिक्षणाकडे वळताना दिसतो आहे..महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालयांत बीएस्सी कृषी व इतर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. बुधवारपासून (ता. ३) स्पॉट अॅडमिशन प्रक्रिया होत आहे. यापूर्वीच बहुतांश कृषी महाविद्यालयांमध्ये असलेल्या जागांपैकी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक जागा भरून झालेल्या होत्या. उर्वरित जागांवर या जागेवरील प्रवेश प्रक्रियेतून विद्यार्थी प्रवेश घेत आहे..Innovation in Education: अज्ञानाच्या अंधारातील चाचपड.बुधवारी अकोल्यात पश्चिम विदर्भातील कृषी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. खुल्या प्रवर्गासाठी सीईटी गुणांचा कट ऑफ तब्बल ८० ते ८५ टक्क्यांदरम्यान गेल्याचे एका प्राचार्यांनी सांगितले. हे एक अपवादात्मक चित्र नसून, प्रत्यक्षात कृषी शिक्षणाविषयी वाढलेली आकर्षणाचीच प्रचिती आहे, असे कृषी शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले..Agriculture Education: कृषी शिक्षणातील संधी अन् फायदे .करिअर घडविण्याच्या संधींमुळे पसंतीगतवर्षांच्या तुलनेत यंदा अर्जांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील विद्यार्थी देखील या शाखेकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. खासकरून संशोधन, अन्नप्रक्रिया उद्योग, कृषी अभियंता, बायोटेक्नॉलॉजी तसेच सरकारी सेवांमध्ये करिअर घडविण्याच्या संधींमुळे पालकदेखील आपल्या मुलांना या शिक्षणाकडे वळवताना दिसत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले..विद्यार्थ्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे यंदाच्या प्रवेशप्रक्रियेत स्पर्धा दिसून येत आहे. चांगले महाविद्यालय मिळविण्यासाठी धडपड केली जात आहे. उच्च गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना अशी संधी सुद्धा उपलब्ध होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.