Nagpur News: नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या दुर्मीळ अशा सिंगी माशाच्या कृत्रिम प्रजननाचा प्रयोग पारशिवणी येथील मंगेश खुबळकर यांनी यशस्वी केला आहे. विदर्भातील हा पहिलाच प्रयोग आहे. मत्स्य विभागाने याची दखल घेतली असून या माशाच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. .मत्स्यसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंगी मासा हा उच्च औषधी गुणधर्मयुक्त आहे. त्याला औषधी मासा असेही संबोधले जाते. यात प्रोटीन आणि लोह मोठ्या प्रमाणात आढळते. आजारपणानंतर अशक्तपणा दूर करण्यासाठी सिंगी माशांचे सेवन अत्यंत फायदेशीर मानले जाते. भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर या माशाला मोठी मागणी आहे..Fish Farmers Relief: राज्यात मत्स्य व्यावसायिकांना अतिवृष्टीच्या मदतीचे दर निश्चित.पूर्वी महाराष्ट्रात सहज आढळून येणाऱ्या या माशाच्या प्रजातीचे वेळीच संवर्धन न झाल्यामुळे आजघडीला सिंगी ही प्रजातीच दुर्मीळ झाली आहे. या माशाचे कृत्रिम प्रजनन करून दाखविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर श्री. खुबळकर यांनी पश्चिम बंगाल येथील मत्स्य तज्ज्ञांची मदत घेतली. दीड वर्षाच्या प्रयत्नानंतर यात त्यांना यश आले. त्यांनी त्याचे ब्रीड तयार केले आहे. विदर्भात हा पहिलाच प्रयोग असल्याची माहिती देखील मत्स्यसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी दिली..संवर्धनासाठी होणार प्रयत्नसध्या देशांतर्गत बाजारात सिंगी माशाची किंमत ४०० ते ६०० रुपये प्रति किलो आहे. जिवंत सिंगी माशाला अधिक किंमत मिळते. याशिवाय औषधी उपयोगामुळे निर्यातीसाठीही या माशाची मोठी संधी आहे. मागणी अधिक पुरवठा कमी असल्याने शेतकऱ्यांसाठी हा मासा उच्च आर्थिक मूल्य देणारा ठरणार आहे. याचे ब्रीड तयार करण्यासाठी मत्स्यविभागाकडे प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे..Fish Seed Quality: यशस्वी मत्स्यपालनासाठी मत्स्यबिजाची गुणवत्ता महत्त्वाची.२०२३-२४ मध्ये केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने श्री. खुबळकर यांना पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मध्यम आकाराचा आरएएस प्रकल्प बांधला. येथे प्रायोगिक तत्त्वावर दुर्मीळ व कठीण प्रजनन असलेल्या सिंगी या माशाचे कृत्रिम पद्धतीने यशस्वी प्रजनन करण्यात त्यांना यश आले..हा प्रयोग विदर्भातील मत्स्य व्यवसायासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. यामुळे दुर्मीळ होत असलेल्या या प्रजातीचे संवर्धन व संरक्षण होईल. याकरिता मत्स्य विद्यापीठासोबत करार केला जाणार आहे.शुभम कोमरेवार, सहायक आयुक्त, मत्स्य व्यवसाय नागपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.