Beed News : परळी तालुक्यातील कौडगाव हुडा शिवारातील तेलेसमुख रस्त्यावर असलेल्या लिंगी नदीवरील पुलावरुन वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज न आल्याने चारचाकी गाडीसह चार युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना रविवारी (ता. १७) मध्यरात्री ११ ते १२ च्या सुमारास घडली होती. त्यापैकी तिघांना वाचविण्यात यश आले असून एकाचा मात्र या घटनेत मृत्यू झाला आहे..यासंदर्भात तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्या माहितीनुसार, कौडगाव हुडा शिवारातील तेलेसमुख रस्त्यावर असलेल्या लिंगी नदीवरील पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत होते. रविवारी रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारास दिग्रस (ता. परळी) येथील अमर पौळ (वय २५), राहुल पौळ (वय ३०), पुणे येथील राहुल नवले (वय २३) व विशाल बल्लाळ (वय २३) हे परळी येथील लग्न समारंभातून कौडगाव हुडा मार्गे डिग्रसकडे कार ने जात होते. .Maharashtra Rain: राज्यात २३० मंडलांत अतिवृष्टी.रात्री अंधारात पुलावरील पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने कारसह चारही व्यक्ती पाण्यात वाहून गेले. या घटनेतील काही जण पुरात झाडात अडकले होते. घटनेची माहिती कळताच महसूल व पोलीस, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य राजाभाऊ पौळ तसेच दिग्रस व कौडगाव हुंडा, पिंपरी येथील ग्रामस्थ यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेत रात्री १ ते ४ वाजेपर्यंत तब्बल तीन तास अथक प्रयत्न करून नदीचे पुरातील पाण्यात अडकलेल्या अमर पौळ या युवकास बाहेर काढले..मात्र, पाण्याचा जोर, नदीचा प्रवाह, अंधार यामुळे इतर तीन जणांना काढणे शक्य झाले नाही. ही शोध मोहीम पहाटे ६ पासून पुन्हा प्रशासन व गावकरी तसेच पोहणारे भोई यांच्या माध्यमातून बचाव कार्य सुरू केली. त्यानंतर राहुल पौळ व राहुल नवले यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. यानंतर नगरपालिकेची टीम घटनास्थळी शोध घेण्यासाठी पोहचली. एनडीआरएफची टीम पुण्याहून घटनास्थळी दाखल झाली. यानंतर शोधकार्य करताना दुपारी १२.३० च्या सुमारास विशाल बल्लाळ याचा मृतदेह आढळून आला..Heavy Rain: अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत.वर्दीतील देव माणूसपरळी वैजनाथ तालुक्यातील कौडगाव हुडा येथे रविवारी (ता. १७) मध्यरात्री एक चारचाकी गाडी पुलावरून पुलाचे पाणी वाहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेली. यामध्ये बसलेले चार जण वाहून गेले. यातील तिघांना वाचविण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आंबेजोगाईचे सहाय्यक पोलिस अधिक्षक ऋषीकेश शिंदे यांनी एक युवक झाडाला अडकलेला पाहताच स्वतः पाण्यात उडी मारुन युवकास वाचवले. .अंबाजोगाईचे सहाय्यक पोलिस अधीक्षक ऋषिकेश शिंदे व सिरसाळा येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरक्षनाथ दहिफळे यांनी थेट पुराच्या पाण्यात उडी घेतली. पुराच्या पाण्याचा प्रचंड वेग, अंधाराचे साम्राज्य असताना या सर्व परिस्थितीत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता शिंदे यांनी पुरात उडी मारून तरुणाचे प्राण वाचविले. या धाडसी कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.