Parbhani News: छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर (टप्पा-१) अंतर्गत ब्राह्मणगाव (ता. परभणी) येथे शनिवारी (ता. ७)समाधान शिबिर घेण्यात आले. शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत फेरफारची ३१ प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली..७/१२ दुरुस्ती संदर्भात १० अर्ज स्वीकारण्यात आले, ६५ डिजिटल ७/१२ उतारे वितरित करण्यात आले, ६५ आठ-अ उतारे उपलब्ध करून देण्यात आले. विविध १८८ प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच २७ अर्ज सिंगल विंडो प्रणालीद्वारे निकाली काढण्यात आले..Revenue Camp: निलजगाव, तुर्काबाद येथे महसूल समाधान शिबिर.शिबिर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्राह्मणगावच्या सरपंच गीता काळदाते या होत्या. उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले उपस्थित होते. तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे, पंचायत समिती सदस्य दिलीप काळदाते, जिल्हा भूमी अधीक्षक श्री. चौधरी, गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, तालुका कृषी अधिकारी विजय नांदे, उपाधीक्षक भूमी अभिलेख सुनील मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सोनवणे, दुय्यम निबंधक भास्कर घुगे, .Revenue Camp: बारामतीत ‘महसूल समाधान शिबिर’ अभियानास आजपासून प्रारंभ.नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिरामध्ये महसूल विभागासह महिला व बाल विकास विभाग,.पंचायत समिती, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, दुय्यम निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख विभाग, आरोग्य विभाग आदी विविध विभागांनी सहभागी होऊन नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.