Jalna News : मागच्या मे महिन्यात जी बैल जोडी ९० हजारांना घेतली ती ५५ हजारांत मागत होते. ते परवडणार नव्हतंच, पण नैसर्गिक आपत्तीन आर्थिक संकट ओढावल्याने दोनपैकी एक बैल २४ हजारांत विकावाच लागला. आर्थिक तडजोड करणं कठीण होऊन बसलं. दुनगाव (डोणगाव दर्गा) येथील ज्ञानदेव चौधर नैसर्गिक आपत्तीत ओढवलेल्या संकटाची माहिती देत होते..अंबड तालुक्यात ८०,७०७ हेक्टरवर नुकसान झाले आहे. तालुक्यात पंचनाम्याची गती अत्यंत संथ असल्याची स्थिती आहे. श्री. चौधर यांची कपाशी, तूर, मोसंबी ही पिकं हातची गेली. ते म्हणाले, ‘‘७ ते ८ एकर कपाशी पण आतापर्यंत ७० ते ८० किलो कापूस तोही पार भिजलेला कसाबसा वेचला. कपाशीतून अजून पाणी वाहतय..Thrilling Bull Race : बैलांची चिखलातली झुंजार स्पर्धा ; पारंपरिक खेळाचा गावरान थरार.मुलगी इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. शिवाय एक मुलगा ‘नीट’ची तयारी करतोय. त्याच्या आणि मुलीच्या शिक्षणाला मोठा खर्च येतो. दिवाळीपूर्वी मुलीच्या कॉलेजची ४० हजारांची फी भरायची आहे. पिकं तर हातची गेली मग पैसे भरावे कसे, या विवंचनेत असताना बैल जोडी घेऊन बीड जिल्ह्यातील हिरापूर येथील बाजार गाठला..मागच्या मे महिन्यात जी जोडी ९० हजारांत घेतली तिला ५५ हजारांत मागत होते. नाईलाज म्हणून एक बैल विकला. जो ४० हजारांत घेतला होता तो २४ हजारांत विकला. आज संकट म्हणून विकावा लागलेला बैल पुन्हा गरज म्हणून ज्यादा दरान घ्यावाच लागंल. त्याशिवाय शेती कसायची कशी?’’.Khilar Bull Reels: खिलार बैलांच्या रिल्स ‘टॉप’वर.माझ्यासमवेत गावातीलच भगवान जायभाये, भानुदास जायभाये, विकास जायभाये यांनीही आपली बैलजोडी विकली. बाजारात पशुधनाचे दर पडले. लाखाची बैलजोडी ७० हजारांत मागत होते. एकाच दिवशी माझ्या एका बैलासह आमच्या गावातील सात बैल विकले, असे श्री. चौधर म्हणाले..रामेश्वर मुंडे म्हणाले, ‘‘गावातील किमान २० टक्के लोकांना हाती पिकं नसल्याने आता बैलजोडी विक्रीसाठी बाजारात नेण्याची वेळ आली आहे. संकट मोठे असल्याने आर्थिक जुळवाजुळव करण्यासाठी पहिली टाच पशुधनावरच आली.’’ दुनगाव येथीलच विक्रम मुंडे म्हणाले, ‘‘आमचं गाव म्हणजे लोकसभेसाठी परभणी तर विधानसभेसाठी अंबड-बदनापूर मतदार संघात आहे. दोन्ही मतदार संघांसाठी शेवटचे टोक. दोन्हीचे लोकप्रतिनिधींकडून उपेक्षित अन् दुर्लक्षित. तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक हेच काय ती नुकसानीची पाहणी करताहेत..आताही अन् तेव्हाही आमचीच गरज असेल...मे महिन्यापूर्वी ८० हजार ५०० रुपयांना घेतलेली बैलजोडी ५५ हजारांत विकावी लागलेले ज्ञानेश्वर जायभाये म्हणाले, ‘‘आता आलेल्या संकटामुळे गरजेपाई कमी दरात बैल विकावे लागले. पुढच्या खरिपापूर्वी जादा दराने बैलजोडी विकत घ्यावी लागेल, तेव्हाही आमचीच गरज असेल. कारण बैलाशिवय आम्ही शेती कसणार कशी. सारी पिकं अजूनही पाण्यात आहेत. चार एकरांतून अजून काहीच हाती आलं नाही.’’ नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर आपले पशुधन विकण्याची वेळ आली आहे. कमी दरात पशुधन मागितले जात असले तरी ते विकण्याशिवाय पर्यायही राहिलेला नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.