Pune News: जुन्नर तालुक्यातील गावकुसापासून ते शिवाराच्या पायवाटांपर्यंत आणि शेतशिवाराला जोडणाऱ्या पाणंद मार्गांपर्यंत सर्व रस्त्यांना आता कायदेशीर ओळख मिळणार आहे. या तालुक्यातील सर्व रस्त्यांची नोंद घेऊन त्यांना भू-सांकेतिक क्रमांक देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. शेतकरी बांधवांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंध असलेल्या या उपक्रमाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे..या उपक्रमाचा पहिला प्रयोग जुन्नर तालुक्यातील मौजे बोरी बुद्रुक येथे नुकताच पार पडला. ग्रामपंचायत, महसूल यंत्रणा आणि ग्रामस्थ यांच्या लोकसहभागातून काढलेल्या शिवार फेरीत आधीच नकाशावर असलेले पाच रस्ते व नव्याने निश्चित झालेले ६९ पाणंद, शेतरस्ते, शिवरस्ते आणि वहिवाटीचे रस्ते यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला..Panand Road: परभणी जिल्ह्यात आजपासून शेत रस्ते विषयक मोहीम.अशा एकूण ७४ रस्त्यांना भू-सांकेतिक क्रमांक देऊन त्यांची ग्रामसभेत मंजुरी घेण्यात आली. त्यानंतर महसूल व भूमिअभिलेख विभागाच्या संयुक्त पथकाने या सर्व रस्त्यांचे सीमांकन करून जीआयएस प्रणालीद्वारे नकाशावर नोंद केली. त्यामुळे बोरी बुद्रुक हे राज्यातील रस्त्यांना सांकेतिक क्रमांक देऊन जीआयएस नकाशावर स्थान देणारे पहिले गाव ठरले आहे..‘‘ग्रामस्थांनी महसूल सप्ताहात सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या गावातील पाणंद, शेतरस्ते व शिवरस्त्यांची नोंद करून ग्रामसभेत मंजुरी घ्यावी. भविष्यातील कायदेशीर अभिलेखासाठी सर्वांनी एकत्र यावे,’’ असे आवाहन तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांनी केले..Farm Road: गावशिवार रस्त्यांचे होणार सीमांकन.‘जीआयएस’द्वारे नोंदणीग्रामसभेत मंजूर रस्त्यांना भू-सांकेतिक क्रमांक देऊन उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयास माहिती पुरवली जाईल.त्यानंतर जीआयएस प्रणालीद्वारे नकाशावर अक्षांश-रेखांशासह नोंदणी होईल. परिणामी गावनिहाय नमुना एक(फ)मध्येरस्त्यांना अधिकृत व कायदेशीर अभिलेख प्राप्त होईल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले..महसूल सप्ताहात राबविणार उपक्रमराज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या या योजनेची अंमलबजावणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. तहसीलदार डॉ. सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तालुका समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. बुधवारपासून (ता. १७) सुरू होणाऱ्या सेवा पंधरवड्यात पहिल्या टप्प्यात ‘पाणंद रस्ता सप्ताह’ राबविण्यात येणार आहे..ग्रामसभेची मंजुरी अनिवार्यसंकलित केलेली माहिती उद्यापासून प्रत्येक गावातील ग्रामसभेत ठेवली जाणार असून, ग्रामसभेची मंजुरी घेणे अनिवार्य असेल. अतिक्रमित वा बंद रस्त्यांबाबत मंडळ स्तरावर रस्ता समितीच्या उपस्थितीत ‘रस्ता अदालत’ घेऊन निर्णय दिला जाणार आहे..काय नोंदविले जाणारया प्रक्रियेत गाव नकाशांवर असलेले व प्रत्यक्षात अस्तित्वात असलेले सर्व प्रकारचे रस्ते नोंदविले जाणार आहेत. यात ग्रामीण रस्ते, हद्दीचे रस्ते, पायमार्ग, शेतरस्ते, वहिवाटीचे रस्ते यांचा समावेश असेल. रस्त्याची लांबी, रुंदी, सुरुवात-शेवट, किती शेतकरी त्याचा वापर करतात, कोणत्या गटातून रस्ता जातो याचा तपशील भरणे बंधनकारक असेल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.