Turmeric Yield : हिंगोली हळद उत्पादकता वाढीसाठी एकात्मिक खत व्यवस्थापनावर भर द्यावा. ट्रायकोडर्मा, पीएसबी व टर्मरिक बूस्टरचा शिफारशीनुसार वापर करावा. आंतरमशागतीची कामे वेळेत करावीत. करपा रोग, कंदकुज व कंदसड यांचे व्यवस्थापन करावे. तसेच खोडकिडा व हुमणी किडीची लक्षणे ओळखून त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रातील उद्यानविद्या विशेषज्ञ अनिल ओळंबे यांनी केले..तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मकोडी (ता. सेनगाव) येथे हळद व खरीप हंगामातील पीक व्यवस्थापनावर एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी श्री. ओळंबे बोलत होते..Sericulture Technology : रेशीम उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे.कृषिविद्या विशेषज्ञ राजेश भालेराव, मृदाशास्त्र विशेषज्ञ साईनाथ खरात, कृषी विस्तार विशेषज्ञ डॉ. अतुल मुराई, मारुती कदम, भारत सांगळे आदी उपस्थित होते..Turmeric Quality Improvement: हळद उत्पादन, गुणवत्तेला प्राधान्य द्या : डॉ. शरद गडाख.श्री. भालेराव यांनी सोयाबीन पिकातील सद्यःस्थितीतील आवश्यक व्यवस्थापन, करपा रोगाची लक्षणे ओळखून करावयाच्या उपाययोजना, तूर पिकामध्ये शेंडा खुडणे व कामगंध सापळ्यांचा वापर याबाबत मार्गदर्शन केले. कापूस पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाबाबतही माहिती देण्यात आली..श्री. साईनाथ खरात यांनी नैसर्गिक शेतीचे महत्त्व तसेच जीवामृत, बीजामृत व अग्निअस्त्र तयार करण्याची प्रात्यक्षिक पद्धत आणि त्यांचे फायदे याबाबत माहिती दिली. डॉ. मुराई यांनी कृषी विज्ञान केंद्राची कार्यपद्धती आणि केंद्रामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध कृषी निविष्ठांची माहिती दिली. यावेळी ट्रायकोडर्मा, मेटारायझियम व टर्मरिक बूस्टर या निविष्ठा उपलब्ध करून देण्यात आल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.