Control Blast Disease: पावसाच्या अनियमितपणामुळे सिंधुदुर्गनगरी जिल्ह्याच्या काही भागांतील भातपिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. जिल्ह्यातील लोरे (ता. कणकवली) परिसरातील प्रादुर्भावग्रस्त भातपिकांची पाहणी कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी अधिकाऱ्यांनी करून शेतकऱ्यांना उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले..जिल्ह्यात यावर्षी पावसाचा अनियमितपणा दिसून आला. बहुतांश वेळ ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. त्याचा परिणाम भातपिकावर झाला आहे. कणकवली, वैभववाडी आणि देवगड तालुक्यांतील अनेक गावांमध्ये भातपिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे..Rain Deficit: पावसाच्या खंडामुळे खरीप पिके धोक्यात.कणकवली तालुक्यातील लोरे गावात करपा रोगाचा प्रादुर्भाव अधिक आहे. कृषी विभागाने प्राथमिक पाहणी केल्यानंतर वेंगुर्ले फळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. यशवंत गोवेकर आणि उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील यांनी प्रादुर्भावग्रस्त पिकांची पाहणी केली..Rain Dry Spell: पावसाच्या खंडामुळे खरीप अडचणीत.डॉ. गोवेकर यांनी करपा रोगाचे व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी ट्रायकोडर्मा तसेच जैविक बुरशीनाशकांचा वापर करावा. तसेच ट्रायसायक्लोझॉल ७५ टक्के डब्ल्यूपी हे १० ग्रॅम औषध १० लिटर पाण्यात मिसळून पिकांवर फवारणी करावी..पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी सरपंच अजय रावराणे, सुमन गुरव, शेतकरी हरिश्चंद्र मोसकर, कैलास मोसकर, संतोष राणे, स्वप्ना नवले, प्रमोद तेली आदी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.