Black Thrips: भारतात, विशेषतः महाराष्ट्रात मिरची हे महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. त्याची लागवड विविध हंगामांत वर्षभर केली जाते. त्यावर अनेक किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यात प्रमुख हानिकारक फुलकिड ही कीड आहे. आजवर मिरची पिकात थ्रिप्स टॅबॅसी आणि स्किर्टोथ्रिप्स डॉर्सेलिस या दोन प्रमुख प्रजाती आढळत होत्या.