Parbhani News: परभणी जिल्हा परिषद व त्याअंतर्गंत ९ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी करून सोमवारी (ता. ९) निकाल जाहीर करण्यात आले. जिल्हा परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली असून प्रथमच मोठे यश मिळाले आहे. जिल्हा परिषदेच्या ५४ पैकी २४ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला १५ जागा, शिवसेना (उबाठा) ६ जागा, शिवसेनेला ५ जागांवर,कॉंग्रेसला ३ जागांवर तर १ जागी अपक्षला विजय मिळाला. बहुमतासाठी २८ जागांसाठी गरज असून जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..परभणी जिल्हा परिषदेच्या ५४ गटांमध्ये २४७ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. भारतीय जनता पक्षाने ४९ जागा, राष्ट्रवादी कॉंग्रेस ४२ जागा, शिवसेना २५ जागा, शिवसेना उबाठाने २३ तर कॉंग्रेसने २१ जागा लढविल्या. उर्वरित ८७ उमेदवारांमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अपक्ष उमेदवार होते. .जिल्हा परिषदेचे व ९ पंचायत समित्यांचे मिळून एकूण ६८० उमेदवार निवडणूक आखाड्यात होते. शनिवारी (ता. ७) एकूण १० लाख ४५ हजार ८५५ पैकी ७ लाख ८३ हजार २४६ (७४.८९ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी (ता. ९) संबंधित तालुक्यांच्या ठिकाणी मतमोजणी झाली. माजी कृषी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांच्या परिवारातील ५ पैकी ४ सदस्यांचा पराभव झाला. वाघीकर कुटुंबातील सासरा व सून दोघांचाही पराभव झाला. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रभाकर रोहीणकर-वाघीकर, समशेर वरपुडर, माजी सभापती मीना राऊत, ऊर्मिला बनसोडे यांचा पराभव झाला..Local Body Results: नांदेड वाघाळा महापालिकेत भाजपचे वर्चस्व.२०१७ मधील निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला २४, शिवसेनेला १३, कॉंग्रेसला ६, भाजपला ५ जागा, रासप ३ जागा, अपक्ष ३ जागा मिळाल्या होत्या. त्यातुलनेत यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला १९ जागा अधिक मिळाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसला ९ जागा कमी मिळाल्या. तर शिवसेनेच्या ७ जागा तर कॉंग्रेसच्या ३ जागा कमी झाल्या..Local Body Results: सलग चौथ्यांदा नागपूरचा गड भाजपने राखला.भाजपला जिंतूर, सेलू , गंगाखेड, पालम पंचायत समित्यांमध्ये बहुमतभारतीय जनता पक्षाला जिंतूर पंचायत समितीतील २० पैकी १४ जागा, सेलू पंचायत समितीत १० पैकी ८ जागा, गंगाखेड पंचायत समितीत १४ पैकी ९ जागा, पालम पंचायत समितीत ८ पैकी ७ जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळाले..राष्ट्रवादी कॉंग्रेसला मानवत पंचायत समितीत ८ पैकी ६ जागा तर सोनपेठ पंचायत समितीत ६ पैकी ५ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळाले. परभणी पंचायत समितीत १० पैकी राष्ट्रवादी कॉंग्रेस ५, कॉंग्रेस ४, भाजप ४, शिवसेना ४, शिवसेना उबाठा २, अपक्ष १ जागा मिळाल्या, पाथरी, पूर्णा पंचायत समितीतही त्रिशंकू स्थिती आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.