Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सात ठिकाणी नगराध्यक्षपदी उमेदवार निवडून आणत पक्षाचे स्थान बळकट केले आहे. दोन ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने, तर दोन ठिकाणी स्थानिक आघाडीने सत्ता काबीज केली. प्रस्थापित नेत्यांनी आपापल्या भागांत सत्तेवरील पगडा कायम ठेवल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. .निकालानंतर स्पष्ट झालेल्या परिस्थितीनुसार संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात, राहाता व शिर्डीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जामखेडला राम शिंदे, कोपरगावला विवेक कोल्हे, राहुरीत प्रसाद तनपुरे, श्रीरामपूरला करण ससाणे, श्रीगोंद्याला आमदार विक्रम पाचपुते, पाथर्डीला आमदार मोनिका राजळे यांनी आपले बलस्थाने कायम ठेवली. नेवाशात मात्र बहुमत मिळूनही शंकरराव गडाख यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार पराभूत झाला. सर्वाधिक चर्चेत असलेल्या कोपरगाव येथे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे काका कोयटे यांचा भाजपचे पराग संधान यांनी दारुण पराभव केला..Muncipal Election Result: पुणे जिल्ह्यात अजित पवारच ‘दादा ’.राहुरीत राष्ट्रवादी (अजित पवार) व राष्ट्रवादी (शरद पवार) यांच्या मदतीने स्थानिक आघाडीचे भाऊसाहेब मोरे विजयी झाले. संगमनेर येथे महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर सेवा समिती नावाने स्थानिक आघाडी स्थापन केली होती. सेवा समितीच्या मैथिली सत्यजित तांबे सुमारे सोळा हजार मतांनी जिंकल्या. श्रीरामपूर येथे कॉंग्रेसचे करण ससाणे जिंकले. .Maharashtra Local Body Election Results 2025: भाजप सुसाट! मुश्रीफांसह अनेक दिग्गजांना मोठा धक्का, जाणून घ्या कोण, कुठे विजयी?.नेवासा नगर पंचायतीत शिवसेना (शिंदे) पक्षाचे डॉ. करणसिंह घुले जिंकले. त्यांनी मंत्री शंकरराव गडाख यांच्या क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे नंदकुमार पाटील यांचा पराभव केला. शेवगावात येथे शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या माया मुंडे निवडून आल्या. भारतीय जनता पक्षाचे नगराध्यत्रपदी अभय आव्हाड (पाथर्डी), सत्यजित कदम (देवळाली प्रवरा), सुनिता खेतमाळीस (श्रीगोंदा), जयश्री थोरात (शिर्डी), स्वाधीन गाडेकर (राहाता) आणि प्रांजल चिंतामणी (जामखेड) हे निवडून आले आहेत..अहिल्यानगर जिल्ह्यातील नगरपालिका व नेवासा नगर पंचायतीसाठी झालेल्या मतदानाची रविवारी (ता. २१) मतमोजणी झाली. सुरवातीला या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र तसे न होता बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्षांतच संघर्ष झाला. काही ठिकाणी स्थानिक आघाड्या झाल्या..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.