Amul Dairy Election : गुजरातमध्ये भाजपने आणखी एक निवडणूक जिंकली आहे. अमूल डेअरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेडा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवले आहे. भाजपने पहिल्यांदाचा या निवडणुकीत क्लीन स्वीप मारला आहे. भाजपने संचालक मंडळाच्या ९ जागांपैकी ७ जागा जिंकल्या. तर गुजरातच्या सहकार क्षेत्रात एकेकाळी वर्चस्व राहिलेल्या काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले..यासाठी मतदानाच्या आधीच भाजपचा पाठिंबा असलेल्या चार उमेदवारांची बिनविरोध निवड झाली होती. आता दूध संघाच्या संचालक मंडळावर भाजपने पूर्ण बहुमत मिळवले आहे..Dudh Dar : जीएसटी झाला कमी, दूध स्वस्त होणार का?; ‘अमूल’, ‘गोकुळ’नं स्पष्ट केली भूमिका.आणंद विभागातून कांती सोढा परमार यांनी ७९ मते मिळवून विजयी झाले. खंभात येथून राजेंद्रसिंह बळवंत परमार ८४ मते, पेटलादमधून बीना तेजस पटेल ८३ मते तर अमूल डेअरीचे विद्यमान अध्यक्ष विपूल पटेल यांनी नडियादमधून ८३ मते मिळवून विजय मिळवला..घेला मानसिंह झाला हे कठलालमधून ७९ मते घेऊन विजय झाले. तर भागवतसिंह परमार यांनी मातरमधून ५३ मतांनी विजय मिळवला. गेल्या वर्षी जुलैमध्ये पक्षविरोधी भूमिका घेतल्याने भाजपमधून निलंबित करण्यात आलेले आणि दोन वेळा आमदार राहिलेले केसरीसिंह सोलंकी यांना मातरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. वैयक्तिक सदस्य गटातून विजय पटेल यांनी चार मतांनी विजय झाले..Interview with Jayen Mehta: गुजरातबाहेरील शेतकरीही ‘अमूल’सोबत जोडणार.काँग्रेसला केवळ २ जागाया निवडणुकीत काँग्रेसचे केवळ दोन उमेदवार जिंकले. बोरसद ब्लॉकमधून ५२ मते मिळवून डेअरीचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रसिंह धीरसिंहजी परमार आणि कापडवंज ब्लॉकमधून भूरा लक्ष्मण सोलंकी ६१ मते मिळवून विजयी झाले..राजकारणात सहकार क्षेत्राचा दबदबागुजरातमधील राजकारणात सहकार क्षेत्राचा दबदबा खूप महत्वाचा मानला जातो. दरम्यान, अमूल डेअरी निवडणुकीत फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेसने भाजपवर केला आहे. भाजपचा हा विजय यासाठी मोठा आहे की कारण त्यांनी पहिल्यांदाच कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर वर्चस्व मिळवले आहे..२०२० मध्ये काँग्रेसला मिळाल्या होत्या ८ जागाफेब्रुवारी २०२३ मध्ये अमूल डेअरीच्या चार संचालकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हाच या प्रतिष्ठित दूध संघावर भाजपला वर्चस्व मिळवण्यात यश आले होते. २०२० मधील निवडणुकीत काँग्रेसने ११ पैकी ८ जागा जिंकल्या होत्या. पण यावेळी भाजपने सत्ता मिळवली आहे. राज्यातील सर्व १८ दूध संघांवर सध्या भाजपचे वर्चस्व आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.