ठळक मुद्देपीकच येणार नाही, अशी परिस्थिती आहेपीक विमा कंपन्यांनी त्यांचे धोरण बदलताना प्रॅक्टिकल विचार करावाशेतकऱ्यांना अधिक मदत देण्याची गरज असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले.Ashok Chavan on Kharif Crop Damage: अतिवृष्टी, पुराने शेतपिकांच्या नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. पीकच येणार नाही, अशी परिस्थिती आहे. यासाठी पीक विमा कंपन्यांनी त्यांचे धोरण बदलताना प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे, असे मत भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (दि. ३०) व्यक्त केले. त्यांनी नांदेड तालुक्यातील पासदगाव, निळा, चिखली या भागांत जाऊन नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. .''असा पाऊस कधी झालाच नव्हता. पीक पाहण्यासाठी ते शिल्लकच राहिलेले नाही. सवर्त्र परिस्थिती सारखीच आहे. हा गोदावरी आणि आसना नदी काठच्या मधला भाग आहे. येथे नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. पीक कापणी प्रयोगानंतर जे उत्पन्न येईल; त्या उत्पन्नावर आधारीत विमा द्यावा, हा अतिशय चुकीचा विषय आहे. शेतात अजून पाणी आहे. शेतात जाऊच शकत नाही. सोयाबीन सडून गेले आहे. पिकाची नासधूस झाली आहे. अशा परिस्थितीत पीक विमा कंपन्यांनी धोरण बदलताना प्रॅक्टिकल काही विचार केला पाहिजे. शासन स्तरावर जे अनुदान देणार आहोत अथवा मदत करणार आहोत; त्यातील पैसे अधिक वाढवण्याची गरज आहे, त्यात काही दुमत नाही. किती जास्त मदत देता येईल? हा विषय आहे.'' असे अशोक चव्हाण म्हणाले. .Crop Damage Compensation : अतिवृष्टी नुकसान मदतीसाठी ‘फार्मर आयडी’ बंधनकारक.Crop Damage : शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, संवेदनशीलतेने काम करावे.नद्यांची पात्र लहान का झाली?दुसरा विषय म्हणजे, नदीची पात्र हळूहळू लहान होत चालली आहे. त्यात गाळ भरलेला आहे. उपसा झालेला नाही. जे मूळ नदीचे पात्र होते ते पुन्हा आहे तसे करणे गरजेचे आहे. झाडेझुडपे काढून टाकायला हवीत. गाळ उपासला पाहिजे. विहिरीसुद्धा बुजल्या आहेत. त्यातील उपसा करायला हवा, असे त्यांनी नमूद केले आहे. .नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे, विशेषतः आसना आणि गोदावरी नद्यांच्या काठावरील भागात मोठ्या प्रमाणात पीक आणि घरांचे नुकसान झाले आहे. अशोक चव्हाण यांनी आज नांदेड तालुक्यातील निळा, आलेगाव, एकदरा, भालकी, चिखली बु., पासदगाव, पुयनी परिसरात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी गावकऱ्यांशी चर्चाही केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.