Indian Politics: आधुनिक ‘अयोध्या कांड’ आणि वनवासातील विरोधक
Modi Government: संसदेपाठोपाठ २२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये भाजप-रालोआची सत्ता असल्यामुळे मोदी सरकारला आता हवी ती विधेयके संमत करण्यापासून विरोधक रोखू शकत नाहीत. राममंदिरातील दानचोरीच्या प्रश्नावर सरकारविरोधात रान उठविण्याची संधी विरोधकांना आहे; पण ती त्यांना साधता येईल का, हा प्रश्नच आहे.