Maharashtra Civic Polls: राज्यातील २९ महानगरपालिकांचा निकाल शुक्रवारी (ता. १६) लागल्यानंतर अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक १४२५, त्या पाठोपाठ शिवसेनेच्या शिंदे गटाने ३९९ जागा पटकावल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेत भाजपने ८९ जागांवर विजय मिळविला.