Solapur News: संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या १२ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल रविवारी (ता. २१) जाहीर झाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने बार्शी, अक्कलकोट, मैंदर्गी, अनगर या ४ ठिकाणी, शिवसेनेने सांगोला, मोहोळ, दुधनी या ३ ठिकाणी नगराध्यक्षपद मिळवले. तर पंढरपूर, मंगळवेढा आणि करमाळ्यात स्थानिक आघाड्यांनी प्रस्थापितांना रोखत नगराध्यक्षपद मिळवले. शिवसेनेला (ठाकरे गट) कुर्डुवाडीत आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) अकलूजमध्ये प्रत्येकी १ जागेवर समाधान मानावे लागले. .अक्कलकोट, मैंदर्गी आणि बार्शीमध्ये भाजपाने आपली पकड मजबूत ठेवली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे बंधू मिलन कल्याणशेट्टी हे अक्कलकोटच्या नगराध्यक्षपदाच्या रिंगणात होते. आमदार कल्याणशेट्टी यांनी अक्कलकोटमध्ये यश मिळवताना, मैंदर्गीतही अंजली बाजारमठ यांच्यारुपाने नगराध्यक्षपद भाजपकडे खेचून आणले. दुधनीत मात्र माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपले पुतणे प्रथमेश म्हेत्रे यांना निवडून आणत कल्याणशेट्टी यांना मत देत आपले वर्चस्व सिद्ध केले. .Nagarpalika Elections Result: भाजपचा नगर परिषद, नगरपंचायतींत वरचष्मा.बार्शीत भाजप-शिवसेना (ठाकरे गट) असा थेट सामना रंगला. पण इथे आमदार दिलीप सोपल विरुद्ध माजी आमदार राजेंद्र राऊत या दोन पारंपारिक विरोधकांची लढाई समजली जात होती. तिथे मतदारांनी भाजपकडे म्हणजे राऊत यांच्या गटाला पसंती देत तेजस्विनी कथले यांना नगराध्यक्षपद दिले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले माजी आमदार राजन पाटील यांनी अनगर नगरपंचायतीत भाजपच्या नगराध्यक्षासह सर्व सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आणले होते..Maharashtra Local Body Election Results 2025: भाजप सुसाट! मुश्रीफांसह अनेक दिग्गजांना मोठा धक्का, जाणून घ्या कोण, कुठे विजयी?.आज फक्त त्याची औपचारिक घोषणा बाकी होती. जिल्ह्यातील उर्वरित सर्वच नगरपालिकांमध्ये भाजपने पक्षाचे म्हणून स्वतंत्र उमेदवार दिले होते. सांगोल्यात तर ऐनवेळी शेकापचा उमेदवार पळवत, त्यांना उमेदवारी दिली, पण तिथे शिंदेंच्या शिवसेनेने भाजपवर मात केली आहे..शिवाय ज्या पद्धतीने जिल्ह्यात भाजपने यंत्रणा राबवली आणि प्रचार केला. त्या तुलनेत अगदीच नगण्य य़श भाजपला मिळाले आहे. दुसरीकडे शिंदे गटाने मात्र भाजपच्या तोडीस तोड कामगिरी करत सांगोला, मोहोळ आणि दुधनीमध्ये मोठे यश मिळवले आहे. मोहोळमध्ये शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे यांनी बाजी मारली..भाजप-शिवसेनेची ही स्थिती असताना, पंढरपूर आणि मंगळवेढा या धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहरांमध्ये ''तीर्थक्षेत्र विकास आघाडी'' ने मोठे यश मिळवले आहे. विशेषतः पंढरपूरमध्ये डॉ. प्रणिता भालके यांची निवड चर्चेचा विषय ठरली आहे. तर मंगळवेढ्यात सुनंदा आवताडे या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून विजयी झाल्या. येथे भाजपचे आमदार समाधान आवताडे, प्रशांत परिचारक यांना यश मिळवता आले नाही. त्याशिवाय कुर्डुवाडीतशिवसेनेला (ठाकरे गट) आणि अकलूजमध्ये शरद पवार गटाने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. करमाळ्यात स्थानिकआघाडीच्या मोहिनी सावंत यांनी बाजीमारली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.