Akola News: महापालिका निवडणुकीत भाजप हा मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. महानगरातील २० प्रभागांत गुरुवारी (ता.१५) ८० जागांसाठी मतदान झाले होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जाहीर झालेल्या निकालात भाजप आघाडीवर होते. मात्र त्यांना बहुमतासाठी पाठिंबा घ्यावा लागणार आहे. अकोल्यात महापालिका मतमोजणी प्रक्रियेची सुरुवात सकाळी १० वाजता झाली आणि दुपारनंतर निकाल यायला सुरवात झाली. पहिल्या फेरीपासूनच भाजपने अनेक प्रभागांमध्ये आघाडी घेतल्याने ही निवडणूक त्यांच्या बाजूने झुकलेली दिसत येत होती. भाजपाने यंदाच्या निवडणुकीसाठी जोर लावला होता. महायुतीत राष्ट्रवादीला सोबत घेत ते रिंगणात उतरले होते. .भाजपने या निवडणुकीसाठी महायुतीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) काँग्रेसला सोबत घेत निवडणूक लढवली होती. पण अंतर्गत गटबाजी, नाराजीमुळे त्यांना स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. काँग्रेससाठी हा निकाल सर्वाधिक फायदेशीर ठरला. कुठल्याही मोठ्या नेत्याची प्रचार सभा न घेताही काँग्रेसने जागा मिळवल्या. अकोल्यात अजूनही काँग्रेसचा मूळ मतदार कायम आहे, हेही यानिमित्ताने दिसून आले आहे. .Local Body Result: बुलडाण्यात नगराध्यक्षपदांवर भाजप, काँग्रेसचे वर्चस्व.सायंकाळी पाचवाजेपर्यंत एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वतंत्रपणे लढून केवळ एका जागेवर अडकलेली होती. दुसरीकडे, उबाठा शिवसेनेने सहा जागा मिळवत आपले अस्तित्व टिकवले. अजित पवार गटाला एक तर शरद पवार गटाला तीन जागा मिळाल्या. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या जागा वाढल्या. शहरातील बदलत्या सामाजिक - राजकीय वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या या वाढलेल्या जागा सांगत आहेत. वंचितने पाच आणि एमआयएमने तीन जागा मिळवत आपला स्वतंत्र मतदार वर्ग मजबूत असल्याचे दाखवून दिले..Local Body Result: सावंतवाडी, वेंगुर्लेत भाजप, मालवणात शिंदे शिवसेना .शिवसेनेची वाताहतया निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरली. मात्र, एकाच जागेवर या पक्षाला समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. उबाठा शिवसेनेने सहा जागांवर विजय मिळवला. गेल्यावेळी ८ जागांवर विजय मिळवला होता. २ जागांवर अपक्ष विजयी झाले. शरद पवार राष्ट्रवादीला ३ जागा मिळाल्या..काँग्रेसचा आलेख उंचावलाया निवडणुकीत काँग्रेस पक्षाने कमाल केली असे म्हटले जात आहे. प्रचारासाठी कुठलाही मोठा नेता फिरकला नाही. तरीही मतदारांनी काँग्रेसला पसंती दिली. अनेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी जोरदार लढत दिली. आ. साजिद खान पठाण यांच्यासाठी हा निकाल नेतृत्व उंचावणारा आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.