Satara News: सातारा, फलटण, रहिमतपूर, म्हसवड, मलकापूर, वाई नगरपालिका व मेढा नगरपंचायत येथे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले. रविवारी दुपारीच निकाल स्पष्ट झाल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर जमलेल्या विजेत्या उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. .दहा नगरपालिका व एका नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीच्या प्रक्रियेदरम्यान झालेल्या मोठ्या नेत्यांच्या सभांमुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघाले होते. तांत्रिक कारणांमुळे मतमोजणी प्रक्रिया लांबणीवर पडल्याने उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांचा जीव टांगणीला लागलेला होता. मतमोजणीची तारीख जवळ येऊ लागल्यानंतर पुन्हा एकदा उमेदवारांसह समर्थकांची घालमेल वाढीस लागली..Maharashtra Nagar Parishad Nagar Panchayat Elections Result: मतदारांचा कौल कुणाला?; मतमोजणीला सुरुवात.रविवारी सकाळी निवडणूक झालेल्या प्रत्येक ठिकाणी मतमोजणीस सुरुवात झाली. अनेकांनी विजयी मिरवणुकीची भलेमोठे हार, सजवलेली वाहने, तसेच वाद्य आणि ध्वनीवर्धक यंत्रणांची जुळणी अनेकांनी केली होती..Bihar Election Results 2025: सत्ताधाऱ्यांनी महिलांना पैसे वाटल्याचा शरद पवारांचा दावा, फडणवीस म्हणाले, 'तुम्हालाही संधी होती...'.सकाळी ११ नंतर सर्वच ठिकाणी विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत मिरवणुका काढण्यास सुरुवात केली. दुपारपर्यंत सर्वच ठिकाणच्या नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदांचे निकाल जाहीर झाले..नूतन नगराध्यक्षभाजपचे अमोल मोहिते (सातारा), समशेरसिंह निंबाळकर (फलटण), रहिमतपूर (वैशाली माने), पूजा वीरकर (म्हसवड), तेजस सोनावले (मलकापूर), अनिल सावंत (वाई), रूपाली वारागडे (मेढा नगरपंचायत) हे उमेदवार निवडून आले. तर, कऱ्हाड येथे शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पुरस्कृत राजेंद्रसिंह यादव, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) महाबळेश्वर सुनील शिंदे व पाचगणीत दिलीप बगाडे यांची नगराध्यक्षपदी निवड झाली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.