Nanded News: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच स्पष्ट बहुमत मिळवत महापालिकेवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण ८१ प्रभागांपैकी भाजपने ४५ जागांवर विजय मिळवला आहे. तर एमआयएमने १५ जागांवर विजय मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. कॉंग्रेसला १० जागा, वंचित बहुजन आघाडीला ५ जागा, शिवसेनेला (शिंदे) ४ जागा, तर १ जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे..भाजपने नांदेड महापालिकेवर प्रथमच वर्चस्व सिद्ध केले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्वबळावर या निवडणुकीत सहभाग घेतला. उमेदवार निवडताना घेतलेली काळजी, पक्षाच्या कामाचा केलेला प्रचार यामुळे भाजपने महापालिका निवडणुकीत बाजी मारली..Local Body Result: अकोल्यात भाजपच ठरला मोठा पक्ष .भाजपला प्रभाग क्रमांक १, ४, ५, ६, ८ (क), ९, १०, १६, १७, १९ आणि २० या भागांमध्ये जवळपास सर्व जागांवर विजय मिळवत आपली मजबूत पकड दर्शवली. एमआयएमला प्रभाग क्रमांक ११, १२ (ब, ड), १३, १४, १५ (अ, ब) या भागांत चांगले यश मिळाले. कॉंग्रेसने काही निवडक प्रभागांमध्ये विजय मिळवला असला तरी बहुमतापासून पक्ष दूर राहिला. .Local Body Result: बीड जिल्ह्यात ‘घड्याळा’चा गजर; महायुतीला यश.महापालिकेतील या निकालामुळे शहराच्या राजकारणात भाजपची सत्ता निश्चित झाली आहे. महापौरपदावरही भाजपचाच दावा बळकट झाला आहे. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष करत आनंद व्यक्त केला..पक्षनिहाय स्थिती...या निवडणुकीत एमआयएम या पक्षाने महापालिकेत १५ जागा मिळवत पुन्हा एकदा दमदार एंट्री केली आहे. तर कॉंग्रेसहीनेही १० जागा खेचून आणल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार), शिवसेना (उबाठा) या दोन पक्षाला खातेही उघडता आले नाही.दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेने चार जागा मिळविल्या आहेत. तर कॉंग्रेस सोबत आघाडी केलेल्या वंचित बहुजन आघाडीने पाच जागांवर यश मिळवत आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. तर सहा महिन्यापूर्वीच नांदेड गाठून निवडणूक लढविणाऱ्या मीनल पाटील यांनी अपक्ष लढवून यश मिळविले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.