Pune News: राज्यात सत्तेत एकत्र असूनही पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या निवडणुकीत एकमेकांसमोर शड्डू ठोकलेल्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये झालेल्या थेट लढतीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘होम पीच’वर पराभवाचा धक्का बसला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमध्ये भाजपच्या विजयाची घोडदौड सुरू असून, दोन्ही ठिकाणी भाजपचाच महापौर होण्याची चिन्हे आहेत..पुणे महानगरपालिकेच्या १६५, तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या १२८ जागांसाठी निवडणूक झाली. सायंकाळी सात वाजेपर्यंतच्या निकालानुसार पुण्यात भाजपने सर्वाधिक ९१, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ८५ जागांवर आघाडी घेत विजय निश्चित केला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका भाजपसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. .Maharashtra Municipal Election Results 2026: राज्यात भाजपची जोरदार मुसंडी, जाणून घ्या महापालिकानिहाय निकाल.तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. सुरुवातीला ‘मैत्रीपूर्ण’ मानली जाणारी ही लढत शेवटच्या टप्प्यात आरोप-प्रत्यारोपांनी रंगली; मात्र त्यात भाजपची सरशी झाली..पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली होती. मात्र निकालात लांडगे यांनी वर्चस्व मिळविले आहे. तेच या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. राष्ट्रवादीच्या ‘होम पीच’वर झालेल्या या पराभवामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. तर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) वेगवेगळे लढले. याशिवाय शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसची युती होती. .अपक्षांची संख्या देखील मोठी होती. सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीच्या कलानुसार शिवसेना (शिंदे गट) दोन जागांवर आघाडीवर आहे. तर शिवसेना (उबाठा) आणि मनसे पक्षाने अद्याप खातेही उघडले नव्हते. तर काँग्रेसच्या ३ जागा आघाडीवर होत्या. माजी उपमहापौर व सहावेळा काँग्रेसकडून विजयी झालेले आबा बागुल यांनी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करून नशीब आजमावले. मात्र भाजपचे महेश वाबळे यांनी त्यांचा पराभव केला..Maharashtra Municipal Election Result 2026: २९ महापालिकांच्या निवडणूक मतमोजणीचा कल हाती, मुंबईवर कुणाची सत्ता?.प्रशांत जगताप विजयीनिवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) शहराध्यक्ष व माजी महापौर प्रशांत जगताप यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्यास विरोध करत आपल्या पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. वानवडी-साळुंखे विहार प्रभागातून त्यांनी विजय मिळवला. त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांचे चिरंजीव अभिजीत शिवरकर यांचा पराभव केला. भाजपमध्ये प्रवेश करून नशीब आजमावलेल्या शिवरकरांना मात्र अपयश स्वीकारावे लागले..रूपाली पाटील यांनी मतमोजणी रोखली राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार रूपाली पाटील ठोंबरे यांनी मतमोजणीदरम्यान यंत्र बदलल्याचा आरोप करत मतमोजणी थांबविल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते..जिल्हा परिषदेसाठी भाजपची जय्यत तयारीपुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांवर विजय मिळवल्यानंतर भाजपने पुणे जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचा निर्धार जाहीर केला आहे. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्ष कार्यालयात जिल्हाध्यक्षांची तातडीची बैठक घेऊन जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली. त्यामुळे आता पुणे जिल्हा परिषद काबीज करण्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरू झाली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.