Farming Problems: भुईमूग, सोयाबीन, उडीद आणि चवळी या नुकत्याच उगवलेल्या पिकांवरील कोवळे अंकुर पाखरांच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पिकांचे संरक्षण करण्यासाठी पहाटेपासूनच शेतात राखणीसाठी ठिय्या मांडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. प्लास्टिकच्या पट्ट्या, कागद आदी उपाययोजना करूनही पाखरांचा उपद्रव कमी होत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत..दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या दमदार पावसानंतर शिरोळ परिसरात खरीप पेरण्यांना वेग आला. पाऊसानंतर पेरणी केलेल्या भुईमूग, सोयाबीन, उडीद आणि चवळी पिकांना अंकुर फुटले असून सध्या चार ते पाच इंच वाढ झालेली आहे. मात्र अंकुरावरील मोड गळण्यापूर्वीच पाखरे ते फस्त करत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे..Unseasonal Rain Damages: पूर्व मोसमी पावसाने साडेचारशे हेक्टरवरील पिके बाधित.सध्या पावसाने दडी मारल्यामुळे जमिनीतून नुकतेच बाहेर आलेले अंकुर अधिक असुरक्षित बनले आहेत. हवामान विभागाने पेरणीबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असले तरी अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. परिणामी आठ-दहा दिवसांपूर्वी पेरलेल्या पिकांवर पाखरांचा उपद्रव वाढला आहे..Rain Crop Damage: पावसामुळे पूर्व विदर्भातील ६३०३ शेतकऱ्यांना फटका.पाखरांना परावृत्त करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी शेतात ठिकठिकाणी प्लास्टिकच्या पट्ट्या आणि कागद बांधले आहेत. वाऱ्यामुळे हे साहित्य फडफडल्याने पाखरे दूर राहतील, अशी अपेक्षा असली तरी त्याचा मर्यादित परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात उपस्थित राहून पाखरे हुसकावण्याची कसरत करावी लागत आहे..दुबार पेरणीची भीतीसध्या पावसाचा खंड पडल्याने पिकांना ओलाव्याची गरज भासू लागली आहे. त्यातच पाखरांकडून होणारे नुकसान वाढल्याने काही भागांत दुबार पेरणीची वेळ येण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत..पुढील पंधरा दिवस महत्त्वाचेपिकांच्या सुरुवातीच्या अवस्थेत पाखरांचा उपद्रव अधिक जाणवत आहे. अंकुराला चार-पाच पाने फुटेपर्यंत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्यानंतर पाखरांचा उपद्रव तुलनेने कमी होण्याची शक्यता असल्याचे शेतकरी सांगतात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.