भारताची २६ देशांत तांदूळ निर्यातीची तयारी२५ हजार कोटी रुपयांचे करार शक्यजिथे पाकिस्तान आणि थायलंड सारख्या प्रतिस्पर्धी देशांचा अधिक प्रभाव या २६ देशांत १.८ लाख कोटी रुपयांचा तांदूळ आयात केला जातो.India Rice Exports: दिल्लीत भारत मंडपम येथे ३० ते ३१ ऑक्टोबर रोजी भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद (BIRC) २०२५ होणार आहे. याचे आयोजन इंडियन राईस एक्सपोर्टर्स फेडरेशन (IREF) ने केले आहे. या परिषदेच्या माध्यमातून भारताचा १.८ लाख कोटी रुपयांची तांदूळ आयात उलाढाल असलेल्या २६ देशांतील बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याचा उद्देश आहे. तसेच या परिषदेदरम्यान २५ हजार कोटींचे करार होण्याची शक्यता आहे. .या दोन दिवसांच्या परिषदेत ३ हजार शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्या, अनेक देशांतील खरेदीदार, मंत्री, राजदूत आणि तांदूळ आयात करणाऱ्या देशांचे व्यापारी प्रतिनिधी सहभागी होतील. फिलीपिन्स, म्यानमार, गॅम्बिया आणि घानाचे मंत्रीदेखील यात सहभागी होणार आहेत..Rice Pest Control: भातावरील गंधी ढेकूण, तपकिरी तुडतुडे आणि लष्करी अळीचे नियंत्रण.भारतीय तांदूळ निर्यातीसाठी भारताने इंडोनेशिया, सौदी अरेबिया, इराक, व्हिएतनाम, जपान, मेक्सिको आणि चीनसह २६ नवीन बाजारपेठा निवडल्या आहेत, असे इंडियन राईस एक्सपोर्टर्स फेडरेशन (IREF) चे उपाध्यक्ष देव गर्ग यांनी यांनी सांगितले. ."भारताचा तांदूळ २६ देशांतील बाजारांत पाठविण्याचा प्रयत्न आहे. जिथे पाकिस्तान आणि थायलंड सारख्या प्रतिस्पर्धी देशांचा अधिक प्रभाव राहिला आहे. या देशांत भारताव्यतिरिक्त इतर देशांमधून १.८ लाख कोटी रुपयांचा तांदूळ आयात केला जातो," असे गर्ग म्हणाले..De-oiled Rice Bran Exports: केंद्र सरकारने अडीच वर्षांनंतर 'डी-ऑइल्ड राईस ब्रॅन'वरील निर्यात बंदी उठवली.भारतीय तांदळाचे विविध वाण, जीआय, बिगर बासमती आणि बासमती हे १.८ लाख कोटी रुपयांची आयात उलाढाल असलेल्या बाजाराची जागा घेऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. .भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. भारतातून सुमारे १७२ देशांना तांदूळ निर्यात केला जातो. जागतिक अन्न पुरवठा साखळीत भागधारकांसाठी त्यांची उपस्थिती आणखी मजबूत करण्याची संधी या तांदूळ परिषदेतून मिळण्याची अपेक्षा आहे. .हेक्टरी उत्पादनात वाढभारताने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये सुमारे ४७ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर सुमारे १५० दशलक्ष टन भात उत्पादन घेतले. हे जागतिक स्तरावरील उत्पादनाच्या सुमारे २८ टक्के एवढे आहे. सुधारित बियाणे वाण, शेती तंत्रज्ञान आणि सिंचन क्षेत्र वाढल्याने सरासरी उत्पादन २०१४-१५ मधील प्रति हेक्टर २.७२ टनांवरून २०२४-२५ मध्ये प्रति हेक्टर सुमारे ३.२ टनांवर पोहोचले..सरकारी आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये, भारतातून सुमारे १२.९५ अब्ज डॉलर्स किमतीचा २०.१ दशलक्ष मेट्रिक टन तांदळाची निर्यात करण्यात आली. हा तांदूळ १७२ हून अधिक देशांमध्ये पाठवण्यात आला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.