Biogas Subsidy For Farmers: बायोगॅस हा ग्रामीण भागात एलपीजी गॅसला एक स्वस्त उत्तम पर्याय ठरू शकतो. यामुळे गॅस सिलिंडरची चिंता मिटते आणि इंधन खर्च वाचतो. तसेच, या माध्यमातून सेंद्रिय खत निर्मितीही होते. सरकारच्या बायोगॅस योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान मिळते. यामुळे त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर मानली जाते..शेतकऱ्यांना एका बायोगॅस संयंत्र उभारणीसाठी साधारण ४० हजार रुपयांचा खर्च येतो. त्यासाठी केंद्र सरकारकडून १४,३५० रुपये अनुदान मिळते. तर जिल्हा परिषद सेस फंडातून प्रति संयंत्र ५ हजार रुपये पूरक अर्थसहाय्य अनुदान देण्याची तरतूद आहे. याचा सर्व घटकातील शेतकऱ्यांना लाभ घेता येतो. पण लाभार्थी शेतकऱ्याकडे २ ते ३ जनावरे असायला हवीत. तसेच त्याच्याकडे ७/१२, ८अ असणे आवश्यक आहे.बायोगॅस निर्मितीसह चांगल्या प्रतिच्या सेंद्रिय खतामुळे रोग जंतू तसेच तणांच्या बियापासून होणारा प्रसार रोखण्यास मदत होऊ शकते. .Biogas Subsidy: बायोगॅस लाभार्थ्यांना १.३० कोटींचे अनुदान मंजूर.बायोगॅसचे फायदे काय?बायोगॅस हा एलपी गॅस सिलिंडरला एक शाश्वत आणि स्वस्त पर्याय आहे.यातून बायोगॅस निर्मितीसह त्यातून बाहेर पडणारी स्लरी ही चांगल्या प्रतिचे सेंद्रिय खत आहे. यामुळे वायूप्रदूषण रोखता येते.ग्रामीण भागात मानवी विष्ठेच्या मलनिस्सारणासाठी बायोगॅस हा एक उत्तम पर्याय असून, त्यामुळे आरोग्याच्या समस्या टाळण्यास मदत होऊ शकते.घरातील ५ ते ६ व्यक्तींचा दोन्ही वेळेचा स्वयंपाक, नाष्टा आणि पाणी गरम करता येऊ शकते. बायोगॅसमुळे महिन्याला साधारण दोन गॅस सिलिंडरची बचत होते. लाकडाची बचत होऊन पर्यायाने निसर्गाचे संरक्षण होते..Biogas Scheme: आता 'सीएनजी', 'पीएनजी'मध्ये बायोगॅसचं मिश्रण? 'गोबरधन' योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?.अटी-शर्ती काय आहेत?लाभार्थी शेतकऱ्याकडे २ ते ३ जनावरे असायला हवीत.बायोगॅस सयंत्र उभारणीसाठी स्वत:च्या मालकीची जागा असणे गरजेचे आहे.शेतमजूर असल्यास ग्रामसेवकाचा दाखला घेणे बंधनकारक आहे.सरकारने मान्यता दिलेल्या मॉडेलच्या सयंत्राची उभारणी करायला हवी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.