Nandurbar News: विरोधकांच्या विरोधासह शेतकरी, ग्रामस्थांच्या तांत्रिक अडचणींवर मात करीत तब्बल दीड दशक रखडलेल्या शिवण नदीवरील बिलाडी धरण प्रकल्पाला गती मिळाली आहे. १९९९ मध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आणि आज त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे काम सुरू झाले. ११३ कोटींची सुधारित मान्यता मागील काळात मिळविली असून, या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे, अशी माहिती माजी आदिवासी विकासमंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी पत्रकार परिषदेत दिली..आमदार डॉ. गावित म्हणाले, १९९९ मध्ये तत्कालीन मंत्री म्हणून बिलाडी धरणाची मुहूर्तमेढ रोवून प्रकल्पाची पायाभरणी आपण केली. २००८ मध्ये मूळ प्रशासकीय मान्यता मिळवून भूमिपूजन केले, ज्यामुळे प्रकल्पाला अधिकृत बळ मिळाले..Dam affected families: मध्य वैतरणा धरणावर प्रकल्पग्रस्तांचा ठिय्या.दीर्घकाळाच्या वादांमधून शेतकरी मोबदला, खामगाव पुनर्वसनाचा प्रश्न यातून मध्यम मार्ग काढून २०२४ मध्ये ११३ कोटी रुपयांची सुधारित मान्यता मिळवली. दृष्टिक्षेपातनैसर्गिक साइटमुळे खर्च कमी होईल, खामगाव शाळेजवळ खोदकाम सुरू, मोठ्या मशिनरीचा वापरभिंतीचे काम सुरू; दोन- तीन वर्षांत.Yeldari Dam: येलदरी धरणावरील उपसा सिंचन योजनेसाठी सर्वेक्षण.पूर्णत: अपेक्षितउर्वरित जमीन अधिग्रहण वेगवान; शेतकऱ्यांना मोबदला मिळेलहा प्रकल्प नंदुरबारच्या शेतीला क्रांती घडवेलधरणामुळे सुमारे ८३० ते १८३० हेक्टरपेक्षा अधिक शेती भूभाग सिंचनाखाली येणार आहे, शेतकऱ्यांना मोठा लाभ.प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ३.७२ दशलक्ष घनमीटर आहेधरणाची भिंत २०७ मीटर लांब असून, त्यावर चार वक्राकार गेट बसवले जातील आणि भिंत पूर्णपणे काँक्रिटीकरणाची असेलधरणामुळे नदीतील ओव्हरफ्लोचे पाणी गुजरातमध्ये जाण्याऐवजी येथे अडवले जाईल, ज्यामुळे पाण्याचा नैसर्गिक संधारण होईलडॉ. गावित यांच्या प्रयत्नामुळे प्रकल्पाच्या अडचणींवर तोडगा, शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना मोठा दिलासा.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.