बिहारमध्ये एनडीए मोठ्या विजयाच्या दिशेनेआरजेडी आणि काँग्रेस यांच्या नेतृत्त्वाखालील महागठबंधनला धक्काभाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येताना दिसत आहेआरजेडीचे राजकीय वारसदार आणि महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव पराभवाच्या छायेत.Bihar Election Results 2025: बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) बहुमतांचा आकडा पार केला आहे. तर आरजेडी आणि काँग्रेस यांच्या नेतृत्त्वाखालील महागठबंधन पिछाडीवर पडली आहे. बिहारमधील २४३ जागांचे कल हाती आले असून एनडीएने १८0 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर महागठबंधन ४९ जागांवर आघाडीवर आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल युनायटेड (जेडीयू) ने ७५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येताना दिसत आहे. भाजपने ८५ जागांवर आघाडी घेतली आहे..नितीश कुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील एनडीए बहुमताचा आकडा सहज पार करत असल्याचे दिसून येत आहे. तर राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्त्वाखालील महागठबंधनला मोठा धक्का बसला आहे. आरजेडी ३४ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस केवळ ६ जागांवर आघाडीवर आहे. .Bihar Election Exit Polls 2025: 'एनडीए'ला बहुमत?, 'महागठबंधन'ला किती जागा?, 'PK'ची जादू चालली नाही, एक्झिट पोल्सचे आकडे काय सांगतात?.तेजस्वी यादव पराभवाच्या छायेतआरजेडीचे राजकीय वारसदार आणि महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव पराभवाच्या छायेत आहेत. ते वैशाली जिल्ह्यातील राघोपूर येथे पिछाडीवर आहेत. राघोपूर हा आरजेडीचा बालेकिल्ल्या मानला जातो. दरम्यान, पाटणा येथील जेडीयू कार्यालयाच्या बाहेर नितीश कुमार यांच्या समर्थकांनी जल्लोष केला..Rahul Gandhi: राहुल गांधींनी ढिगभर पुरावे देत दाखवली मतांची चोरी.बिहार विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान झाले. येथे ६७.१३ टक्के मतदान आहे. ही मतदानाची टक्केवारी १९५१ नंतरची सर्वाधिक आहे. यामुळे मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या बाजूने कौल देणार? याकडे लक्ष लागले होते. .बहुतांश एक्झिट पोल्सनी बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) बाजी मारणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. तर महागठबंधन (Mahagathbadhan) पिछाडीवर पडेल आणि प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्या जनसुराज पक्षाचा प्रभाव पडणार नसल्याचे एक्झिट पोल्सनी आकडेवारीवरुन दिसून आले होते. आता प्रत्यक्ष निकाल हाती येत असून एक्झिट पोलमधील अंदाज खरे ठरताना दिसत आहेत. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.