बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सकाळी ११ पर्यंत ३१.३८ टक्के मतदानाची नोंद दुसऱ्या टप्प्यात २० जिल्ह्यांतील १२२ जागांसाठी मतदान यासाठी १,३०२ उमेदवार रिंगणात आहेतया टप्प्यात ३ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत.Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज मंगळवारी (दि. ११) सकाळी ७ वाजता सुरु झाले. सकाळी ११ पर्यंत ३१.३८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. दुसऱ्या टप्प्यात २० जिल्ह्यांतील १२२ जागांसाठी मतदान होत असून यासाठी १,३०२ उमेदवार रिंगणात आहेत. यात नितीश कुमार यांच्या सरकारमधील नऊ मंत्र्यांचा समावेश आहे. तर या टप्प्यात ३ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत..याआधी ६ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले होते. या टप्प्यात बिहारच्या इतिहासात सर्वाधिक ६४.६६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. .Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर: दोन टप्प्यांत मतदान, १४ नोव्हेंबरला मतमोजणी.मंगळवारी मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात बिहारच्या नवादा जिल्ह्यातील वारसालीगंज भागातील एका बूथजवळ राजकीय पक्षांच्या समर्थकांमध्ये किरकोळ वादावादीची घटना सोडली तर इतर ठिकाणी शांततेत मतदान सुरु आहे..खरी लढत भाजप-जेडी(यू) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील महागठबंधन यांच्यात होत आहे. जवळपास दोन दशकांपासून बिहारच्या राजकारणावर मुख्यमंत्री नितीश कुमार वर्चस्व गाजवत आहेत. बिहारमध्ये एनडीएला सत्ता टिकवून ठेवायची आहे. तर तेजस्वी यादव यांच्या आघाडीमुळे नेतृत्वात बदल होईल की नाही हे निकालावरून स्पष्ट होईल..Rahul Gandhi On Vote Chori : मत चोरीवरून भाजप आणि निवडणूक आयोगावर राहुल गांधींनी केले गंभीर आरोप; निवडणूक आयोगाकडे मागवले उत्तर.दुसऱ्या टप्प्यात पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, सीतामढी, मधुबनी, सुपौल, अररिया आणि किशनगंज यासह नेपाळ सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये ४ लाखांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील बहुतांश जागा सीमांचल प्रदेशात आहेत. जिथे मुस्लिम लोकसंख्या अधिक आहे. यामुळे दुसरा टप्पा हा एनडीए आणि इंडिया आघाडी या दोघांसाठीही महत्त्वाचा मानला जात आहे. एनडीएने विरोधकांवर घुसखोरांना संरक्षण दिल्याचा आरोप केला. तर विरोधी पक्षाचे अल्पसंख्याक मतदारांवर गणित अवलंबून आहे. .प्रशांत किशोर यांचा सत्ता परिवर्तनाचा नाराजन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी मतदारांना पहिल्या टप्प्यापेक्षाही अधिक मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सत्ता परिवर्तनाचा नारा दिला आहे. दिल्ली स्फोटांबाबत बोलताना ते म्हणाले की, निवडणुकीच्या दरम्यान अशा गोष्टी घडत आहेत. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे..नितीश कुमार काय म्हणाले?मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, लोकशाहीत मतदान करणे हा केवळ अधिकारच नव्हे तर आपली एक जबाबदारीदेखील आहे. सर्व मतदारांना त्यांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे..पीएम मोदींचे तरुणांना आवाहनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा नवा विक्रम बनविण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील तरुणांना, जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, त्यांना माझी एक विशेष विनंती आहे की त्यांनी स्वतः मतदान करावे आणि इतरांनाही असे करण्यास प्रेरित करावे, असे मोदी यांनी म्हटले आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.