Pune News : जीएसटी कपातीनंतर ट्रॅक्टरच्या किमती ६२ हजार रुपयांपर्यंत, तर इतर कृषी यंत्रांच्या किमतीत पावणेदोन लाख रुपयांपर्यंत बचत होणार असल्याचा दावा केंद्र शासनाच्या यंत्रणांनी केला आहे. त्यामुळे बाजारातील उलाढाल वाढणार आहे..पान मसाला, गुटखा, सिगारेट, जर्दा, उत्पादित न केलेला तंबाखू आणि बिडी यांव्यतिरिक्त इतर सर्व वस्तूंवरील जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) दरातील बदल येत्या २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. त्यामुळे कृषी यंत्रे व अवजारे उत्पादक कंपन्या सध्या त्यांच्या कच्चा माल पुरवठादारांकडील सुधारित किंमत सूचीची वाट बघत आहोत..Textile Industry GST: टॉवेल, चादर उद्योगाला जीएसटी स्लॅबमध्ये कोणताही दिलासा नाही.अवजारे तयार करण्यासाठी सुटे भाग लागतात. त्यावर पुरवठादार नेमकी किती सूट देत आहेत, हे सुधारित कोटेशनमधून लक्षात येणार आहे. कोटेशनमधील आकडे व निर्मिती खर्च याचा मेळ बसवून यंत्र किंवा अवजाराची मूळ किंमत किती रुपयांनी कमी करायची, याचा निर्णय अवजार उत्पादक घेणार आहेत..अॅग्रिकल्चरल मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भारत पाटील म्हणाले, ‘‘कृषी यंत्रे व अवजारांवरील जीएसटीत कपात होऊन तो पाच टक्के केला गेला आहे. म्हणजेच एकूण सात टक्के सवलत मिळाली आहे. मात्र सुट्या भागांवर जीएसटी कपात सवलत दिली की नाही या बाबत अवजार उत्पादक उद्योग संभ्रमात आहे. .त्यामुळे आमच्या पुरवठादारांनी आम्हाला सात टक्के सवलत दिली तरच ती ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे. समजा आम्हाला पूर्वीप्रमाणेच १८ टक्क्यांनी सुट्टे भाग खरेदी करावे लागले, तर आम्हाला पुन्हा हिशेब करावे लागतील. त्यानंतरच मूळ उत्पादनात ग्राहकाला नेमकी किती सूट द्यायची हे कृषी यंत्र उत्पादक ठरवतील. त्यासाठी किमान दोन आठवड्यांचा कालावधी लागेल.’’.Agriculture GST Reform: ग्राहकांपर्यंत झिरपावी कर सवलत.दिवाळीमध्ये बाजारपेठ प्रचंड धूम‘खेतीगाडी’चे संस्थापक व ट्रॅक्टर उद्योगाचे अभ्यासक प्रवीण शिंदे म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना ट्रॅक्टर किंवा कृषी अवजारे निश्चितपणे कमी किमतीत मिळतील. केंद्र शासनाने जीएसटी कपातीचा निर्णय जाहीर करताच तत्काळ किमती उतरणे अपेक्षित नाही. कारण जीएसटी कपातीची प्रत्यक्ष व्यवहारात अंमलबजावणी कशी करायची हे उत्पादक कंपन्यांना अभ्यासाअंती ठरवावे लागते..आमच्या मते राज्यातील शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीत २६ हजार ते ६५ हजार रुपयांपर्यंत सवलत मिळेल. तसेच ट्रॅक्टरचलित अवजारांवर पाच हजारांपासून ते २५ हजारांपर्यंत, तर उच्चक्षमतेच्या यंत्रांवर ५० हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. परंतु त्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल. दिवाळीमध्ये मात्र कृषी यंत्रांची बाजारपेठ प्रचंड धूम करेल यात शंका नाही..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.