Bhum News: भूम तालुक्यात मध्यरात्री ढगफुटीसदृश्य झालेल्या पावसाने साडेसांगवी, चिंचपूर व बेलगावमध्ये पाणी शिरले. यात अनेक शेतकऱ्यांची दीडशे ते दोनशे लहान मोठी जनावरे पाण्यामध्ये वाहून जाऊन दगावली. तालुक्यातील सहा पाझरतलाव रात्रीच्या पावसाने फुटल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळाली. .चिंचोली येथील एका वृद्ध महिलेचा पाण्यामध्ये वाहून मृत्यू झाला आहे रविवारी रात्री अकरानंतर मुसळधार पावसाला सुरूवात झाली. बाणगंगा व रामंगगा नदीचा साडेसांगवी येथे संगम होत असल्याने नदीने पाणी पातळी ओलांडल्यानंतर साडेसांगवी गावामध्ये मध्यरात्री पाणी शिरले. नागरिकांनी सतर्कता दाखवत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली..Solapur Flood: सीनानदीच्या पुरामुळे मोहोळ, माढ्याला फटका.मात्र, मुक्या प्राणांना जिवाला मुकावे लागले. घरामध्ये पाणी शिरल्याने घरातील वस्तूंचे नुकसान झाले. यात सर्वाधिक नुकसान बेलगाव पिपळगाव येथील दूध उत्पादक शेतकरी विश्वनाथ दातखिळे यांचे झाले. त्यांच्या दहा गायी वाहून गेल्या तर, १८ गायी जाग्यावर दगावल्या. वीस शेळी, दीडशे कोंबड्यासह सौर पॅनेल, दीडशे ट्रॅक्टर शेणखत व चारा पुरामध्ये वाहून गेला..साडेसांगवी येथील शंभरहून अधिक लहान मोठी जनावरे पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली आहेत. शेतकरी ज्ञानेश्वर डोंबाळे यांचे जनावरे व शेळ्या वाहून गेल्या चिंचपूर येथील द्राक्ष बागा, सोलर पंप, पेरू बाग नष्ट झाल्या आहेत..Flood Relief Fund: अतिवृष्टिग्रस्तांना मदतीपोटी ६८९ कोटींना मान्यता.वारेवडगाव, पाठसांगवी, हिवरडा, वालवड चुंबळी, मोहिते नगर वालवड व वालवड पाझर तलाव फुटले आहेत. तर आरसोली व भूम पाझर तलाव क्रमांक पाच तर डुक्करवाडी साठवण तलाव फुटण्याच्या मार्गावर आहेत. .धाराशिव जिल्ह्यात ६३ हजार हेक्टरवरील पिकांना बाधाधाराशिव जिल्ह्यात २० ते २२ सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे ६२ हजार ९८९ हेक्टर वरील पिके उध्वस्त झाली आहेत. जिल्हा प्रशासनाने तसा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. ९२ गावे बाधित झाली असून ६४ हजार २९ शेतकरी शेतकऱ्यांना फटका बसला आहे..६२ हजार ९७५ हेक्टरवरील जिरायती पिकांचे तर चार हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आणखी हे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. सर्वाधिक नुकसान परंडा व भूम तालुक्यात झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली..अचानक आलेल्या पुराच्या पाणी आमच्या घरामध्ये व गायीच्या गोठ्यामध्ये शिरले. त्यामुळे घरातील साहित्याचे नुकसान झाले असून गायी व शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. शासनाने आम्हास मदत द्यावी .- ज्ञानेश्वर श्रीकृष्ण डोंबाळे, शेतकरी साडेसांगवी ..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.