Kharif Season: यंदा मॉन्सूनची लवकर चाहूल लागल्याने भुदरगड तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. .पिंपळगाव परिसरात पेरणीची धांदल सुरू झाली असून, काही ठिकाणी भात पेरणीला प्रारंभ झाला आहे. तर काही ठिकाणी रोपलागवडीसाठी भाताच्या वाफे तयार करण्याची लगबग सुरू आहे..Summer Crop Sowing: मराठवाड्यात ४३ हजार ८४२ हेक्टरवर उन्हाळी पेरणी.रोहिणी नक्षत्र सुरू झाल्याने भात पेरणीला गती आली आहे. हे नक्षत्र बी पेरणीसाठी शुभ मानले जाते. त्यामुळे शेतकरी मशागत, पेरणी, शेणखत टाकणे आदी कामांत व्यस्त झाले आहेत. .Land Preparation: शेतांची पूर्वमशागत सुरू.शिवारात नांगरट, कुळवणी आणि पेरणीची कामे सुरू असल्याने गावोगावी शेतीकामांची वर्दळ वाढली आहे. .खतांचे दर वाढल्याने जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी शेतकरी शक्य तितक्या प्रमाणात शेणखताचा वापर करताना दिसत आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.