Nashik News : भोजापूर कालव्यावरील दोडी वितरिकेसह मुख्य कालव्याच्या दुरुस्तीसाठी सरकारने १४ कोटी ४६ लाख २१ हजार ९७८ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. कालव्याची गळती थांबवण्यासाठी सिमेंटच्या अस्तरीकरणासह विविध कामे पूर्ण केली जाणार आहेत. .भोजापूर कालव्याला मोठी गळती असल्याने केवळ २० ते ३० टक्केच पाणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचत होते. ७० टक्क्य़ाहून अधिक पाणी गळतीमुळे कालव्याचा पाहिजे तसा उपयोगच शेतकऱ्यांना होत नव्हता. गळती रोखण्यासाठी जलसंपदा विभागाने गुरुवारी (ता.४) दुरुस्तीच्या विविध कामांना मंजुरी दिली. .Khandesh Irrigation Project : रावेरातील सर्व सिंचन प्रकल्प भरले.त्यामुळे कालवा दुरुस्ती करण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास गेली आहे. कालव्याद्वारे २१५ क्यूसेस क्षमतेने पाणी वाहून नेले जाऊ शकते. परंतु, गळतीमुळे केवळ १५० क्यूसेस क्षमतेने पाणी सोडण्याची वेळ जलसंपदा विभागावर येते. .याशिवाय कालव्याला गळती असल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत ३० टक्क्यांपर्यंत पाणी पोहोचत होते. परिणामी पाण्याचा अपव्यय होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुरेसे पाणी उपलब्ध करण्यास अडचणी येत होत्या. दरम्यान पाणी मिळावे यासाठी यापूर्वी शेतकऱ्यांनी आंदोलनेही केले आहेत..Irrigation project: अकोल्यातील सिंचन प्रकल्प तुडुंब.साडेचार हजार हेक्टरला लाभकालवा दुरुस्तीच्या कामानंतर सिंचनाची क्षमता असलेले चार हजार ५०० हेक्टर क्षेत्र पूर्णपणे ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रासाठी ही बाब आशादायी ठरणार आहे. भोजापूरच्या लाभात सिन्नर व संगमनेर तालुक्यातील २४ हून अधिक गावे आहेत..असा आहे भोजापूर कालवाकालव्याची लांबी १७.१२ किलोमीटरकालव्यावर पाणीवापर संस्था ५प्रकल्पावरील सरासरी पर्जन्यमान ६५० मिलिमीटरपूरपाण्याने भरण्यात येणारे बंधारे ५ लघु तलाव,१५ पाझर तलावधरणाची क्षमता २६१ दशलक्ष घनफूट.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.