Water Shortage: ऐन उन्हाळ्यात भिवंडी शहरातील पाणीटंचाई अधिकच तीव्र झाली आहे. नागरिकांना अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. शहराला पूर्वी मिळणाऱ्या १२६ दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्यापेक्षा सध्या ११ दशलक्ष लिटर पाणी कमी मिळत आहे. तुलनेत मोठी तूट निर्माण झाल्याने अनेक भागांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिकेवर आली आहे. विशेषतः कामगार वस्त्या, झोपडपट्ट्या आणि उंचावरील भागांमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे..उन्हाळ्याची सुरुवात होताच पाणीटंचाई आणि त्यावरून होणारा नागरिकांचा संताप व व्यापक आंदोलने ही नित्याचीच बाब बनली आहे. भिवंडीतील विशेषतः कामगार वस्त्या, सामान्य लोकवस्ती आणि उंचावरील झोपडपट्ट्यांसह २८ झोपडपट्टी भागांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. या भागांमध्ये कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. महापालिकेकडून सध्या तीन टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात असून आणखी दोन टँकर्स भाड्याने घेण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण पाच टँकर्सच्या माध्यमातून बाधित भागांमध्ये पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीटंचाईमुळे अनेक भागांतील नागरिकांची शिष्टमंडळे दररोज महापालिका कार्यालयासमोर निदर्शने करत असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत..Indapur Water Crisis: खडकवासलातून २२ गावांना पाणी सोडा; सिंचन भवनासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन.महापालिका क्षेत्राची लोकसंख्या १२ लाख असून शहराला दररोज सुमारे १८० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, सध्या केवळ ११५ एमएलडी पाणी उपलब्ध होत असल्याने तब्बल ६५ एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाली आहे..Jayakwadi Water Protest: जायकवाडी कालव्याच्या पाण्यासाठी ठिय्या आंदोलन. यामध्ये ‘स्टेम’ प्राधिकरणाकडून ७३ एमएलडी तर मुंबई महापालिकेकडून ४२ एमएलडी पाणी मिळत असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांनी दिली. यापूर्वी वऱ्हाळा तलावातून दररोज अतिरिक्त पाच एमएलडी पाणी मिळत होते. मात्र, तलावातील वाढते प्रदूषण आणि दूषित पाण्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने या तलावातून पिण्याचे पाणी उपसण्यावर बंदी घातली आहे. त्यातच ‘स्टेम’ प्राधिकरणाने अलीकडेच सहा एमएलडी पाणीकपात केल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे..पुरवठ्यात सुधारणा होण्याची अपेक्षामुंबई महापालिकेकडे दररोज अतिरिक्त पाच एमएलडी पाणीपुरवठ्याची मागणी केली असून ती मंजूर झाल्यास परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. या उपाययोजनांव्यतिरिक्त, दैनंदिन वापरासाठीचे अनेक भागांना बोअरवेल्स आणि विहिरींच्या माध्यमातून पाणी पुरवले जात आहे. जनतेच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे, असे कार्यकारी अभियंता संदीप पटनावर यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.