LPG Gas Supply Problem: व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे भिवंडी तालुक्यातील मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या अनेक ढाबाचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी त्यांनी पुन्हा पारंपरिक चुली आणि कोळशाच्या शेगड्यांचा आधार घेतला आहे..साधारणपणे १८०० रुपयांना मिळणारा सिलिंडर सध्या काळ्या बाजारात तब्बल चार हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती ढाबा मालकांनी दिली. इतक्या महागड्या दराने गॅस खरेदी करणे परवडत नसल्याने पर्यायी मार्ग स्वीकारला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात; तसेच व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करून ढाबा व्यवसायाला दिलासा द्यावा, अशी मागणी चालकांकडून करण्यात येत आहे..Gas Shortage Issue: गॅस तुटवड्याचे राजकीय परिणाम.रोजगार टिकवण्यासाठी धडपडभिनार येथील जय मल्हार ढाब्याचे मालक महेश राणे यांनी सांगितले की, ढाबा बंद ठेवण्यापेक्षा कामगारांचा रोजगार टिकवण्यासाठी आम्ही चुली आणि कोळशाच्या शेगड्यांचा आधार घेतला आहे. प्रत्येक ढाब्यावर साधारण २० ते २५ कामगार काम करतात. व्यवसाय बंद केला तर कामगारांचा रोजगारही धोक्यात येईल..LPG Shortage : एलपीजीच्या टंचाईवरून लोकसभेत चर्चेची मागणी; विरोधकांकडून घोषणाबाजी.पदार्थांमध्ये घटखाद्यपदार्थांच्या किमती वाढवल्यास ग्राहक नाराज होण्याची शक्यता असल्याने आम्ही अडचणीत सापडलो आहोत. ढाब्यावरील कामगारांसाठी जेवणाची सोय ठेवणेही आवश्यक असल्याने पारंपरिक चुली पेटवण्याचा निर्णय घ्यावा लागला. ढाब्यावर साधारण २००हून अधिक खाद्यपदार्थ उपलब्ध असले तरी सध्या केवळ ५ ते १० पदार्थच ग्राहकांना देणे शक्य होणार असल्याचे महेश राणे यांनी नमूद केले..मुरबाडसह शहापुरात तुडवडासरळगाव, ता. १५ (बातमीदार) : सध्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने त्याचे पडसाद मुरबाडसह शहापूर तालुक्यातही उमटताना दिसत आहे. गॅस सिलिंडर सहज उपलब्ध होत नसल्याने हॉटेल व्यवसाय कसा सुरू ठेवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे..हॉटेल व्यवसायावर हजारो कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे सिलिंडरचा पुरवठा खंडित राहिल्यास अनेक कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. मुरबाड आणि शहापूर परिसरात मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय सुरू असून या व्यवसायाची संपूर्ण मदार गॅस सिलिंडरवर आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायच अडचणीत आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.