Rural Economy Maharashtra: गोंदिया जिल्ह्यातील ऐतिहासिक नवेगावबांध जलाशय हा सिंचनासोबतच परिसरातील नागरिकांच्या उपजीविकेचाही महत्त्वाचा आधार ठरत आहे. फेब्रुवारी ते जुलै या कालावधीत तलावात नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणाऱ्या भिशी कांद्यामुळे (कमळ कंद, Nelumbo nucifera) परिसरातील सुमारे १५ ते २० गावांतील एक हजारांहून अधिक कुटुंबांना हंगामी रोजगार मिळत आहे. .तीन ते चार महिन्यांच्या या हंगामात एका कुटुंबाला १० ते २० हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त उत्पन्न मिळत असल्याने हा व्यवसाय अनेकांसाठी आर्थिक आधार बनला आहे. सुमारे ४५० वर्षांचा इतिहास असलेला नवेगावबांध जलाशय गोंदिया जिल्ह्यातील सर्वांत मोठा मालगुजारी तलाव म्हणून ओळखला जातो. सिंचन, मत्स्य व्यवसाय, पशुधनासाठी पाणी, कंदमुळे संकलन आणि शेती अशा विविध माध्यमांतून या तलावामुळे रोजगार निर्माण झाला आहे..Maize Farming: गोंदिया जिल्ह्यात मक्याला प्रोत्साहन.त्यात भिशी कांद्याचा व्यवसाय विशेष महत्त्वाचा ठरत आहे. परिसरात भिशी कांदा, पोवन कांदा, कमळ कंद किंवा कमळ ककडी अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा कंद रासायनिक खतांशिवाय नैसर्गिकरीत्या तयार होत असल्याने त्याला आरोग्यदायी अन्न म्हणून ग्राहकांची पसंती मिळत आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेसह छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातही या कंदाला मोठी मागणी आहे..छत्तीसगडमध्ये हा कंद ‘ढेस’ या नावाने प्रसिद्ध असून, येथील मोठा माल रायपूर व राजनांदगावसह विविध बाजारपेठांमध्ये पाठविला जातो. मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा भिशी कांद्याचे उत्पादन अधिक झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. १९९५ मध्ये दोन रुपये प्रति किलो दराने विक्री होणाऱ्या या कंदाचा दर सध्या स्थानिक बाजारात सुमारे ८० रुपये प्रति किलो, तर शेजारील राज्यांमध्ये १०० ते १५० रुपये प्रतिकिलो इतका मिळत आहे..Nagzira Tiger Reserve Forest : नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाढणार वाघांची संख्या .नवेगावबांध, जांभळी, येलोडी, रामपुरी, पवनीधाबे, रांजीटोला, कान्होली, पांढरवाणी, मुंगली, तिडका, खोली आणि बोंडे आदी गावांतील अनेक कुटुंबांच्या आहारात भिशी कांद्याला महत्त्वाचे स्थान आहे. या कंदापासून भाजी, चिप्स तसेच वाळवून साठवणूक करून विविध पदार्थ तयार केले जातात..वर्षभर मजुरी करून उदरनिर्वाह करावा लागतो. फेब्रुवारी ते जुलै या काळात तलावातून भिशी कांदे काढून विक्री केल्याने अतिरिक्त उत्पन्न मिळते. बाहेरगावचे व्यापारीही खरेदीसाठी येतात. या तीन-चार महिन्यांत भिशी कांद्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो.नागाबाई कांबळे, भिशी कांदा विक्रेती, नवेगावबांध.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.