Temple Infrastructure Development: ‘श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर ३१ मेपासून भाविकांसाठी पुन्हा खुले होणार आहे. पुनर्बांधणीसह सुरक्षा व सुविधा विकासकामे अंतिम टप्प्यात आहेत. यापुढे आता अधिक सुलभ आणि नियोजित दर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे,’ असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले..राज्य सरकारने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिली, त्यानुसार काम करण्यासाठी मंदिर ९ जानेवारीपासून बंद ठेवण्यात आले होते. .Bhimashankar Temple: महाशिवरात्रीच्या काळात भीमाशंकर मंदिर राहणार बंद.तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार मंदिर परिसरातील गर्दी व्यवस्थापन आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ही कामे हाती घेण्यात आली होती. यामध्ये भव्य नवीन सभामंडप उभारणी, पायरी मार्ग, जाण्याच्या मार्गांची सुधारणा, गर्दी नियंत्रण व्यवस्था, दर्शन मार्गिका, विश्रांती क्षेत्रे इत्यादींचा समावेश आहे. .Bhagwant Temple Development: भगवंत मंदिर तीर्थक्षेत्र आराखड्यातील प्रस्तावित कामांना मंजुरी देणार.सभामंडपाचे काम पारंपरिक तंत्रज्ञान वापरून वेगाने पूर्ण करण्यात आले असून, सध्या ९० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले..दरम्यान, नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या वाढत्या संख्येला अनुरूप सुविधा उपलब्ध करून देणे, हा मुख्य उद्देश असल्याचे डुडी यांनी नमूद केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.