Bhimashankar Mandir Reopen: श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून दर्शनासाठी खुले होणार
Bhimashankar Darshan Update: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर १५ जूनपासून भाविकांसाठी पुन्हा खुले होणार आहे. मंदिर परिसरात सुरू असलेली सभामंडप उभारणी, पायरी मार्गाचे बांधकाम तसेच भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.