Flood Alert : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण ९८.७९ टक्के भरले असून, पूर्ण क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. वरच्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे धरणात दौंड येथून ३२,५२८ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाण्याची वाढती पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गुरुवारी (ता.६) सकाळी ६ वाजेपासून भीमा नदीपात्रात मुख्य सांडव्याद्वारे ४०,००० क्युसेक आणि जलविद्युत केंद्राद्वारे १,६०० क्युसेक असा एकूण ४१ हजार ६०० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे..नदीपात्राव्यतिरिक्त शेती आणि सिंचनासाठी मुख्य कालव्यातून २,५५० क्युसेक, बोगद्यातून ९०० क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून २८० क्युसेक आणि दहिगाव योजनेतून ९० क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने नदीची पाणी पातळी वेगाने वाढत आहे. गेल्या ४-५ दिवसांपासून पंढरपुरातील पूरस्थिती अद्यापही कायम आहे. .Bhima River Flood Situation : भीमा नदीला पूरस्थिती कायम.नदीकाठच्या कुटुंबांना या आधीच सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. तरीही पाण्याची आवक कमी जास्त होत असल्याने नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी खबरदारी बाळगावी व नदीपात्रात उतरणे टाळावे, असे आवाहन धरण व्यवस्थापनाने केले आहे. .Bhima Flood Issue: ‘भीमे’च्या पुरामुळे पाच हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली.सलग दुसऱ्या वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात उजनी पूर्ण भरण्याच्या मार्गावर असल्याने सोलापूरसह पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे..उजनी धरणातील पाणीसाठा (६ ऑगस्ट)एकूण पाणी पातळी- ४९६.७७५ मीटरपाणी साठा: ११६.५८ टीएमसीउपयुक्त साठा: ५२.९२ टीएमसीपाण्याची टक्केवारी -९८.७९ टक्के.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.